“कायदे” सोडून “कमिशन” ने प्रशासन चालवू पाहणाऱ्या जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे बुरे दिन सुरू”

गडचिरोली, २५ मार्च : “कायद्याने” नाही तर “कमिशन” ने प्रशासन चालविण्याच्या नादात जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी आता चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी जिल्ह्याची सूत्रे स्वीकारताच अश्या भ्रष्ट आणि कमिशनखोर अधिकाऱ्यांविरोधात कडक कार्यवाह्या करण्यास सुरुवात केलेली आहे.

खणिकर्म अधिकाऱ्यांनंतर आता येथील नियोजन अधिकारी रडारवर आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवत जिल्हा खणिकर्म अधिकारीउमेश बरडे यांनी खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून प्रस्तावित केलेली कोट्यवधी रुपयांची कामे रद्द करुन  जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्याविरुध्द खणिकर्म विभागाला अहवाल पाठवला होता, त्यानंतर बरडे यांच्याकडील पदभार काढून घेतला. यानंतर आता जिल्हानियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बरडेंप्रमाणे ते देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर असूनत्यांच्याविरुध्द काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जिल्हा नियोजन अधिकारी यांनी पत्नीच्या खात्यात लाचखोरीचे पैसे स्वीकारल्याचा आरोप आहे. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीरामपाचखेडे यांनी पत्नीच्या बँक खात्यात लाचखोरीचे पैसे स्वीकारल्याची तक्रार १७ मार्च रोजी मयूर गव्हारे, पवन भांडेकर, गणेशभांडेकर, नेताजी खोडवे, भूषण सेकुरतीवार या कंत्राटदारांनी केली होती. जिल्हाअंतर्गत विकासकामे मंजूर करण्यासाठी पत्नीच्याखात्यात पैसे स्वीकारल्याचा आरोप असलेले जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तक्रारदार कंत्राटदारांनी २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे यासंदर्भातील बँक व्यवहाराचा तपशील सादर केलाअसल्याची माहिती आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसमोर कंत्राटदारांनी सादर केलेल्या बँक व्यवहाराच्या तपशील मधे २२ ऑक्टोबर २०२४ रोजी संतोष बंडावार यांच्याखात्यातून लाख ८० हजार रुपये तर २८ ऑक्टोबर २०२४ रोजी भवानी कॉन्ट्रोवेंचर प्रा.लि. कंपनीच्या खात्यातून पाचखेडे यांच्यापत्नीच्या खात्यात दीड लाख रुपये रक्कम जमा केली आहे. कंत्राटदारांनी पुरावे सादर केल्याने जिल्हा नियोजन अधिकारी पाचखेडेयांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील काही महिन्यांपासून गडचिरोली जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा गोंधळ अधिकच वाढतचालला आहे. पाचखेडेपूर्वी या पदावर असलेले खडतकर यांची सुद्धा त्यांच्या वादग्रस्त कार्यप्रणालीवरून हकालपट्टी करण्यात आलीहोती. त्यामुळे पाचखेडेबाबत प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!