December 23, 2024

त्या “दलित युवकाला” न्याय कोण देणार? गेल्या दोन महिन्यापासून कुरखेडा पंचायत समिती समोर उपोषण करतोय!”

1 min read

“प्रशासनातील अधिकारी या युवकाच्या उपोषणाला नियमबाह्य व अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत त्याच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत”

कुरखेडा,(प्रतिनिधी); ८जुलै: तब्बल दोन महिन्यापासून म्हणजे १० मे २०२३ पासून कुरखेडा पंचायत समिती समोर एक युवक उपोषणास बसलेला आहे. हात पंप दुरुस्ती करिता गेले 18 वर्षे काम केल्यानंतर कुरखेडा येथे नियुक्ती व्हावी म्हणून दोन वर्षापासून शासकीय कार्यालयांच्या चकरा मारून थकलेला हा युवक उपोषणाच्या मार्गाने न्याय मागतोय.
कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील रहिवासी असलेला देवचंद लक्ष्मण ढवळे हा युवक स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात उपोषणा करतोय. त्याची उपोषण हे अनधिकृत असल्याचा ठोका ठेवत अधिकारी त्याचे राष्ट्र मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.
प्राप्त माहितीनुसार ४ मे २००२ पासून कुरखेडा येथील हात पंप दुरुस्ती करिता कामा करिता नियुक्त झाला होता. कुरखेडा येथे १२ वर्ष काम केले. प्रकृती बरोबर नसल्याने काही दिवस कामावर गैरहजर राहिला. त्याचे विनंती वरून मुख्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी मार्च २०१४ ला एटापल्ली येथे कामावर नियुक्ती दिली. परिवारात दोनच मुली असून पत्नी सोबत राहत नाही त्याचा तिच्यासोबत घटस्फोट झाला आहे. मुलींचे पालन पोषण व शिक्षणाची सोय व्हावी म्हणून २०१८ मध्ये विनंती अर्ज करून एटापल्ली वरून कोर्ची येथे विनंती करून नियुक्ती आदेश मागून घेतला. २०२० पर्यंत काम कोरची येथे हात पंप दुरुस्तीचे काम केले. २०२० सली कुरखेडा येथे रिक्त जागा असल्याने येथे गावाजवळ नियुक्ती करिता विनंती अर्ज केला. कुरखेडा संवर्ग विकास अधिकारी यांना प्रस्ताव पाठविण्याची विनंती करून दोन वर्ष पासून हेलपाटे मारत आहे. अधिकाऱ्यांना भेटून काहीच उपयोग झाला नाही. शेवटी उपोषण करून आपली मागणी मान्य होईल या आशेने तो तब्बल २ महिन्या पासून येथील पंचायत समिती समोर बसला आहे.

“देवचंद ढवळेच्या उपोषणाबाबत येथील प्रशासनाची भूमिका”
देवचंड ढवळे यांच्या उपोषणा संदर्भात येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत संवाद केला असता असं लक्षात आलं की त्यांनी हे मान्य केलं की ट्रायसेम हातभार दुरुस्ती कंत्राटदार म्हणून २००२ पासून २०१२ पर्यंत पंचायत समिती कुरखेडा येथे कार्यरत होते. सन २०१० ते २०१२ च्या कालावधी करिता देवचंद ढोरे यांनी पंचायत समित्या कुरखेडा अंतर्गत हात पंप देखभाल दुरुस्ती करारनामा केला. सदर कालावधीत जानेवारी २०१२ ते मार्च २०१२ पर्यंत हात पंप दुरुस्तीचे कामावर गैरहजर होते. तसेच २०१२ ते २०१४ या कालावधीत त्यांनी करारनामा केला नसल्यामुळे पंचायत समिती कुरखड्याकडून पुढील कालावधी करिता अभिप्राय सादर करण्यात आला नाही. सन २०१२ ते २०१६ पर्यंत कुठेही कार्यरत नसल्यामुळे त्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली नाही. सन २०१६ ते २०१८ पर्यंत त्यांचे विनंतीवरून पंचायत समिती एटापल्ली येथे हातपंप व देखभाल दुरुस्तीचा कंत्राट देण्यात आला. स्वगावी म्हणजे घाटी येथे ये – जा करण्यास अडचण होत असल्याने सन २०१८ ते २०२० या कालावधी करिता विनंतीवरून पंचायत समिती कोरची येथे हातपंप देखभाल दुरुस्तीचा कंत्राट देण्यात आला. गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरची यांचे कडून देवचंद ढोरे यांच्या कामाबाबतचा अभिप्राय असमाधानकारक सादर करण्यात आल्याने पुढील कालावधी करिता त्यांचे नाव वगळण्यात आले. १० जानेवारी २०२२ ते १३ जुलै २०१२ ला हातपंप दुरुस्तीचे कामावर घेण्याबाबत त्यांनी कार्यालयास पत्र दिले १८ एप्रिल २०२२ व ५ ऑगस्ट २०२२ चे पत्रद्वारे त्यांनी हात मध्ये कामावर येण्याबाबतची कार्यपद्धतीबाबत अवगत करण्यात आले. ८ मार्च २०२३ ला पत्र देऊन देवचंद ढवडे यांना ९ मार्च २०२३ पासून जिल्हा परिषद पंचायत समिती उपोषण सुरू केले. १० मार्च २०२३ ला उपोषण नियमबाह्य असल्याचे त्यांना पत्र द्वारे अवगत करण्यात आले. त्यानुसार त्यांनी उपोषण मागे घेतले. २४ एप्रिल २०२३ चे पत्राने आमदार श्रीकृष्ण गजबे यांनी देवचंद ढवळे यांना जिल्हा परिषद सेवेत समावेश घेण्यासंदर्भात कळवले होते. २३ एप्रिल २०२३ चे पात्रअन्वय आमदार कृष्णा गाजबे यांना सदर अनुषंगाने कळविण्यात सुद्धा आले. १० मे २०२३ पासून देवचंद ढवळे हे पंचायत समिती कुरखेडया समोर उपोषणाला बसले होते पोलीस प्रशनासह कारवाही झाल्याने दिनांक १७ मे २०२३ ला उपोषण मागे घेत असल्याबाबत देवचंद ढवळे यांनी लिहून दिले. २३ मे.२०२३ पासून पुनश्च ते पंचायत समिती कार्यासह बसून आहेत.
यादरम्यान देवचंद ढवळे यांना दोन वेळा जिल्हा परिषद गडचिरोली येथे सदर प्रकरणात सुनावणीसाठी बोलवण्यात आल्याचे येथील अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले. परंतु दोन वेळा पत्र देऊनही ते सुनावणीला गडचिरोली येथे हजर झाले नाही त्यामुळे त्यांच्या या मागणीला न्याय देता आलं नाही असं अधिकाऱ्यांची भूमिका आहे.
गडचिरोली येथे सुनावणीसाठी बोलावलं नंतर आपण का गेला नाही असं प्रश्न देतील उपोषण करते देवचंद ढवळे यांना विचारलं असता त्यांनी आपल्याकडे आर्थिक कुवत नसल्याने आपण गडचिरोली मुख्यालय पर्यंत जाऊन सुनावणी हजर होऊ शकत नसल्याचे येथील अधिकाऱ्यांना सांगितल्याचे बोलले आहे. पुढील सोनवणे निश्चित करून मला गडचिरोली पर्यंत जाण्याची सोय केल्यास मी अवश्य तिथपर्यंत जाण्याची करेल असेही त्यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितला आहे. अन्यथा माझ्या उपोषण स्थळी सुनावणी करून मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

“वडील उपोषणावरमुली शिक्षण सोडून दुकानात कामावर”
देवचंद च्या परिवारात दोन मुली आहेत. एक मुलगी १२ , दुसरी १० व्या वर्गात आहेत. दोन वर्ष पासून वडिलांच्या हाताला काम नाही. आई घटस्फोट घेवून निघून गेली. शिक्षण करावे की पोचाची सोय करावी. या विवंचनेत असताना सध्या त्या शाळेत न जाता येथील एका किराणा दुकानात काम करत आहेत. प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे एक हास्य खेळता परिवार कसं विखरून जातं याचं जिवंत उदाहरण म्हणजे घाटी येथील देवचंदचा परिवार.

About The Author

error: Content is protected !!