“ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या पाठपुराव्याला यश; अहेरीत जिल्हा व अतिरिक्त सत्र् न्यायालय स्थापन”; शनिवार 22 जुलै रोजी उदघाटन होणार”

अहेरी; अन्वर शेख,(तालुका प्रतिनिधी); २० जुलै: गडचिरोली येथील जिल्हा सत्र न्यायालयात अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यातील पक्षकार व नागरिकांना ये-जा करणे खुप अडचणीचे होते, सोबतच भौगोलिक व क्षेत्रफळ दृष्ट्या विचार करून या भागातील नागरिकांनी आणि तालुका अधिवक्ता संघ अहेरी व सिरोंचा यांनी खुप वर्षाआधी अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व्हावे यासाठी मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे मागणी लावून धरले होते.

तालुका अधिवक्ता संघ अहेरी व सिरोंचा तसेच या भागातील नागरिकांची तीव्र व एकमुखी मागणी लक्षात घेऊन अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु व्हावे यासाठी मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून मागणी लावून धरले होते मागणी जूनी असून अखेर मागणी व प्रयत्नाना यश आले आहे.
अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे शनिवार 22 जुलै रोजी उदघाटन होणार असून यासाठी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्यायमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी, अतुल चांदुरकर, संजय मेहरे आणि गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश ऊदय शुक्ल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन संपन्न होणार आहे.
विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रा.गवई यांनीसुद्धा अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु व्हावे यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन कसोशिने प्रयत्न केले होते.
मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वतः पुढाकार घेऊन अहेरी व सिरोंचा तालुका अधिवक्ता संघाला वेळोवेळी अधिवेशन काळात नागपुर तसेच मंत्रालय मुंबई येथे मदत करायचे. अहेरी अधिवक्ता संघाचे शिष्टमंडळ मुंबई येथे अनेकदा गेले असून त्यासाठी वेळोवेळी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी मदतीसाठी पुढे सरसावले अखेर अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु होत असल्याने नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त करून मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांचे आभार मानत आहेत.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!