जगातील सर्वोत्कृष्ट आनंद विद्यार्थ्यांना शिकविण्यातुन मिळते- “खुर्शीद शेख”
1 min read“आधुनिक जगाचा आदर्श गुरू ; आज शिक्षक दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या शिक्षकाचे प्रेरणादायी कार्य गाथा”
सिरोंचा( कौसर खान) ; ५ सप्टेंबर: तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेलगत आसरअल्ली या सिरोंचा तालुक्यातील दुर्गम गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिकवतात. ज्या दुर्गम भागात पायही ठेवण्यासाठी शिक्षक धजावत नाहीत, त्या भागात -केवळ वर्ग घेण्याची औपचारिकता न करता विद्यार्थ्यांना त्यांच्याच भाषेत शिकवून या शिक्षकाने तमाम शिक्षकांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
तेलगु बोलीभाषेत शिकवले की विद्यार्थ्यांचे खुलणारे चेहरे एका शिक्षकाला खरेखुरे आत्मिक समाधान देतात. खुर्शीद शेख हे या शिक्षकाचे नाव आहे. त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 मध्ये झाला आहे.
मुलांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगितले तर त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, हे लक्षात घेऊन शेख सरांनी मुलांशी संवाद वाढविला. हळूहळू मुलांना शिक्षणाची गोडी लागली आणि आठ वर्षांपूर्वी असलेली ४७ विद्यार्थ्यांची संख्या आज 250 च्या वर पोहोचली. यासाठी ग्रामपंचायतनेही संगणकासारख्या सुविधा पुरवत सर्व सहकार्य केल्याचे खुशिद शेख आवर्जून सांगतात. आसरअल्ली या गावात तेलगु संस्कृती व भाषेचे प्राबल्य आहे त्यामुळे मुलांना तेलगू भाषेच्या मदतीने अभ्यासक्रमी भाषेशी जोडून अध्ययनात रस निर्माण करणे सहज शक्य नव्हते परंतु आपल्या उपक्रशील कला कौशल्यांचा उपयोग करून शाळेला शिक्षणाचे आनंदवन बनविण्यात यशस्वी ठरले हे शिक्षक
10 वर्षांपूर्वी खुर्शिद शेख यांची जि प केंद्र शाळा आसरअल्ली येथे रुजु आणि शिक्षणाचा नवीन अध्याय सुरू झाला. आसरअल्लीला येण्यापूवी सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर अतिदुर्गम भागात सहा शिकवल्यामुळे शेख यांना माङीया भाषा चांगली अवगत झाली होती. त्या फायदा झाला. शाळेतील मुले केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर मराठी, हिंदी इंग्रजी भाषाही चांगल्या प्रकारे बोलू लागले आहेत. त्यांच्यातील न्यूनगंड दूर होऊ त्यांचा आत्मविश्वासही वाढला आणि नकारात्मकतेला सकारात्मकते बदलण्याची ही किमयाच खुर्शीद शेख यांना राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत घेऊन गेली. आज जि प.शाळा पट कमी झाल्याने ओसाळ झालेल्या दिसतात परंतु महाराष्ट्रच्या सीमेवर असलेल्या या शाळेत विद्यार्थी आत्मविश्वासाने नव्या जगाशी जुळत आहे. शेख सरांच्या कलात्मक व संशोधनात्मक अध्यापन पध्दतीत आपल्या गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रेरित केले आहे त्यामुळे आज विद्यार्थी नवोदय, शिष्यवृत्ती व ईतर स्पर्धा परीक्षांत यशस्वी होत आहे. त्यांच्या “जालीवुड “सारख्या उपक्रमाने तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक चित्रपट सृष्टी निर्माण केली आहे. त्यांच्या मते “जीवंत शाळाच विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवु शकते आणि त्यासाठी शिक्षक हा जीवंत, उर्जावान आणि संवेदनशील हवा.. आज खुर्शीद शेख जर बालकांचे पालक, मित्र, तर समोपदेशक म्हणून त्याच्यांत वावरतांना दिसतात. विद्यार्थी आणि त्यांच्यातील भावनिक नातेच विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा देतात. तंत्रज्ञानाच्या वापरातुन शाळेला – विद्यार्थ्यांना तसेच समाजाला दिशा देण्याचे कार्य शेख सर करीत कारण एकच त्यांच्या मते शिक्षक कधीच साधारण नसतो.