April 25, 2025

मिनी बँकेतून पैसे काढताना सावधगिरी बाळगा: डॉ. पूर्णानंद नेवारेंच्या सतर्कतेमुळे महिलेची आर्थिक लूट थांबली

कुरखेडा, १ एप्रिल २०२५: मानवी हक्क कार्यकर्ते डॉ. पूर्णानंद नेवारे यांच्या सतर्कतेमुळे एका महिला खतेदाराला मोठ्या आर्थिकफसवणुकीपासून वाचवण्यात यश मिळाले आहे. ही घटना मिनी बँक मधून पैसे काढताना घडली असून, यामुळे नागरिकांनी मिनीबँक मधून व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आजच्या डिजिटल युगात आर्थिकफसवणुकीच्या घटना वाढत असताना, या घटनेने सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.

ही घटना नुकतीच एका स्थानिक मिनी बँक केंद्रात घडली. एक महिला आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी या मिनी बँकेतगेली होती. तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने तिला दोन हजार रुपये आधार कार्ड बायोमेट्रिक पद्धतीने विथड्रॉल केले. मात्र त्याखातेदाराला सांगण्यात आले की , तीन दिवस बँक बंद असल्याने तीन  दिवसांनी खातेपुस्तकची एन्ट्री मारून घ्यावी. परंतु सदरखतेदाराची भेट डॉ. पूर्णानंद नेवारे यांच्याशी झाल्याने त्यांनी खाते पुस्तकची एन्ट्री केले असता दहा हजार रुपये चे विथड्रॉल झाल्याचेलक्षात आले. नंतर त्यांनी तात्काळ मिनी बँकेत सदर खातेदाराला नेऊन व्यवहाराची केंद्र प्रमुख सोबत शहानिशा केल्यानंतर  काहीवेळातच महिला खातेदाराच्या खात्यात आठ हजार रुपये परत पाठविण्यात आले. अशाप्रकारे काही मिनी बँकेतून ग्राहकांची मोठ्याप्रमाणात आर्थिक लूटमार सुरू आहे.

डॉ. पूर्णानंद नेवारे हे गेल्या अनेक वर्षांपासून मानवी हक्कांसाठी कार्यरत आहेत. सामाजिक अन्याय आणि फसवणुकीविरोधातत्यांची लढाई सर्वश्रुत आहे. या घटनेतही त्यांनी आपली सतर्कता आणि सामाजिक बांधिलकी दाखवून दिली. “लोकांनी आपल्याआजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः मिनी बँक सारख्या ठिकाणी अनेकदा फसवणूक होते, त्यामुळेनागरिकांनी सावध राहावे,” असे त्यांनी या घटनेनंतर सांगितले.

अलीकडच्या काळात मिनी बँक माध्यमाने फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्किमिंग डिव्हाइसेस, बनावटकार्ड्स आणि थेट मदतीच्या बहाण्याने फसवणूक करणे असे अनेक प्रकार समोर येत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केलेकी, नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देण्यापूर्वी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

डॉ. नेवारेंच्या सतर्कतेमुळे या महिलेचे मोठे आर्थिक नुकसान टळले. ही घटना सर्वसामान्य नागरिकांसाठी एक धडा आहे की, आपणआपल्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल जागरूक राहिले पाहिजे. विशेषतः मिनी बँकेत व्यवहार करताना डिजिटल संवेदनशीलठिकाणी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

या घटनेमुळे डॉ. पूर्णानंद नेवारे यांच्या कार्याचे कौतुक होत असून, त्यांनी सामाजिक जाणिवेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. नागरिकांनीही अशा घटनांमधून बोध घेऊन आपली सुरक्षितता स्वतःच्या हाती घ्यावी, हाच या प्रसंगाचा संदेश आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!