April 26, 2025

गोंडवाना विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यात सामंजस्य करार: अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षणाला प्रोत्साहन

गडचिरोली, एप्रिल  : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (एमएसएसडीएस) यांच्यात काल, एप्रिल रोजी एक महत्त्वाचा सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. हा करार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतबोकारे यांच्या उपस्थितीत पार पडला असून, यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचालाभ घेता येणार आहे. या कराराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणालाअनुसरून कौशल्य विकासाला चालना देणे हा आहे.

हा करार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता नवोपक्रम विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्यविकास सोसायटी आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यातील सहकार्याचा एक भाग आहे. या करारांतर्गत खालील बाबींवर भर देण्यात येणार आहे:

अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण : विद्यापीठात विविध क्षेत्रांतील अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. यातमाहिती तंत्रज्ञान, उत्पादन, सेवा क्षेत्र आदींचा समावेश असेल.

रोजगार संधी : प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना सोसायटीमार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेजातील.

श्रेयांक प्रणाली : प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी योग्य प्रमाणात श्रेयांक (क्रेडिट्स) दिले जातील, जे अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटमध्येहस्तांतरित करता येतील.

कराराची मुदत : हा सामंजस्य करार पुढील पाच वर्षांसाठी (२०२५२०३०) लागू राहील.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद केलेल्या कौशल्य विकासाच्या घटकांना प्रोत्साहन देणे हा या कराराचा पाया आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितले की, “हा करार विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावहारिककौशल्य प्रदान करेल, ज्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होतील.” तर सोसायटीचे प्रतिनिधी श्री. अंकुश वाशिमकरयांनी नमूद केले की, “ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक गरजांनुसार प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हे आमचे ध्येयआहे.”

या कराराच्या समारंभाला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रकुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिलहिरेखन, नवसंशोधन, नवोपक्रम साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार, डॉ. कृष्णा कारु यांच्यासह महाराष्ट्र राज्यकौशल्य विकास सोसायटीचे प्रतिनिधी श्री. अंकुश वाशिमकर आणि श्री. अभय देशमुख उपस्थित होते. तसेच, जिल्हा कौशल्यविकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली येथील सहाय्यक आयुक्त श्री. योगेंद्र शेंडे हेही या प्रसंगी हजर होते.

श्री. योगेंद्र शेंडे यांनी या कराराचे स्वागत करताना म्हटले की, “गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील युवकांना दर्जेदार कौशल्यप्रशिक्षण मिळाल्यास त्यांच्या रोजगारक्षमतेत नक्कीच वाढ होईल. हा करार स्थानिक विकासाला चालना देणारा ठरेल.” स्थानिकविद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला असून, त्यांना आता शिक्षणाबरोबरच नोकरीची हमी मिळण्याची आशा निर्माणझाली आहे.

गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील शैक्षणिक विकासाचे केंद्र आहे. या भागातील युवकांना उच्च शिक्षणमिळत असले तरी व्यावसायिक कौशल्यांच्या अभावामुळे रोजगार मिळवणे आव्हानात्मक ठरते. हा करार या समस्येचे निराकरणकरेल आणि विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवेल. तसेच, अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्सच्या माध्यमातूनत्यांच्या शैक्षणिक प्रगतीलाही हातभार लागेल.

या करारांतर्गत लवकरच प्रशिक्षण कार्यक्रमांची रूपरेषा तयार केली जाईल आणि पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाला सुरुवात होईल. स्थानिक उद्योग आणि कंपन्यांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. हा करारगडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!