December 23, 2024

“कांग्रेसचा वतीने तालूक्यात हाथ से हाथ जोडो अभियानाची सूरवात”

1 min read

कूरखेडा;(प्रतिनिधी); २१ मार्च: केंद्र शासनाचा जनविरोधी व मनमानी धोरणाबाबद जनजागृति करण्याकरीता तालुका कांग्रेस पक्षाचा वतीने आज मंगळवार रोजी तालूक्यात हाथ से हाथ जोडो अभियानाची सूरवात येथील प्रभाग क्र ४ मधून करण्यात आली.
यावेळी केंद्राचा सत्तेत खोटे आश्वासने देत आलेल्या भारतिय जनता पक्षाचा काळात महगाईचा भडका उडाला आहे त्यामूळे सर्व सामान्याचे जीणे कठीन झाले आहे,देशात खाजगीकरणाचे धोरण राबविण्यात येत असल्याने रोजगाराचा संधी हीरावल्या जात आहेत शेतकरी विरोधी कृषी कायद्यामूळे बळीराजा देशोधळीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच लोकशाही मूल्य पायदळी तूळवत हूकूमशाही देशात लादण्याचा केंद्र शाशनाचा प्रयत्न आहे या जनविरोधी धोरणाचा विरोध करीत त्याबाबद जनजागृति करण्याकरीता कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तालूक्यातील गावागावात पोहचणार आहे या मोहीमेचा श्रीगणेशा आज शहरातील प्रभाग क्र ४ मधून करण्यात आला याप्रसंगी कीसान कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे तालुका कांग्रेस अध्यक्ष जिवन पाटील नाट जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे माजी जि प सदस्य नंदू नरोटे माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी महिला कांग्रेस अध्यक्ष आशाताई तूलावी यूवक कांग्रेस तालुका अध्यक्ष गिरीधर तितराम माजी प स सदस्य धरमदास उईके माजी प स सभापति संध्या नैताम ओबीसी आघाडीचे जिल्हा सचिव मनोज ढोरे ,पूंडलीक निपाने,नगरपंचायत सभापति हेमलता नंदेश्वर नगरसेविका कूंदा तितीरमारे,माजी नगरसेवक उसमान पठान,प्रतिभा सिडाम,माजी सरपंच संजय कोरेटी,राजू बावनथळे, शोएब मस्तान रूखसार शेख, सिराज शेख,पांडूरंग लंजे,डोमा सूखदेवे,उध्दव कापगते व कांग्रेस कार्यकर्ते उपस्थीत होते.

About The Author

error: Content is protected !!