“विद्यार्थ्यांनो तुमच्या आवडीच्या क्षेत्रात सर्वोत्तम करा – गटविकासअधिकारी धीरज पाटील यांचे प्रतिपादन”
1 min readज्ञानज्योती स्पर्धाग्राम येथे प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न”
कुरखेडा ; (प्रतिनिधी); २२ मार्च: येथील ज्ञान ज्योति स्पर्धा ग्राम येथे आयुष्यावर बोलू काही हा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जेष्ठ समाजसेवक डॉक्टर सतीश गोगुलवार, प्रमुख पाहुणे म्हणून एसबीआयचे व्यवस्थापक योगेश डोंगरवार, रोहित ढवळे प्रा. रोहित ढवळे तसेच मुलाखतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कुरखेडा येथील गटविकास अधिकारी धीरज पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी मुलाखतीच्या शेवटी विद्यार्थ्यांना संदेश देताना धीरज पाटील यांनी, ” विद्यार्थ्यांनो तुमच्या रुचीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा. माझ्या तुमच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आहेत, ” असा मनोदय व्यक्त केला.
यावेळी ज्ञानज्योतीची विद्यार्थिनी भारती कसारे हिने मुलाखत घेतली. तसेच ज्ञानज्योतीची विद्यार्थिनी प्रीती कोडवते हिने कार्यक्रमाचे संचालन केले तर पाहुण्यांचे आभार ज्ञानज्योतीचा विद्यार्थी लोकेश हटवार याने मानले.
सदर कार्यक्रमास विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेत आम्ही आमच्या आरोग्यासाठी व ज्ञानज्योती परिवाराचे सहकार्य लाभले.