सिकलसेलवर अभ्यासक्रम तयार होवून शालेय पाठ्यक्रम म्हणून शिकवले जाणार; डॉ. रमेश कटरे यांच्या प्रयत्नांना यश”
1 min read“कुरखेडा येथील आरोग्यधाम संस्थेचे डॉ. रमेश कटरे यांच्या अथक प्रयत्नाने सदर अभ्यासक्रम शालेय शिक्षण तसेच वैद्यकीय क्षेत्रात लवकरच शिकवला जाईल”
कुरखेडा;(प्रतिनिधी); 23 मार्च; येथील आरोग्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रमेश कटरे यांनी सिकलसेल या अनुवंशिक आजारावर अभ्यासक्रम तयार करून पाठ्यक्रमात सहभाग करून घ्या अशी मागणी शासन दरबारी केली होती. विषयाचे गांभीर्य व या रोगाची व्याप्ती पाहता ही मागणी पूर्ण होवून संपूर्ण देशातील विद्यापीठांमध्ये या विषयाचा पाठ्यक्रम तयार होवून अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
भारतातील विद्यापीठ मान्यता देणाऱ्या विश्वविद्यालय अनुदान आयोग या संस्थेने याची दखल घेत सिकलसेल या दुर्धर रोग संबंधी माहिती पाठ्यक्रम मध्ये सहभागी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या आशयाचा एक पत्र २० मार्च २०२३ रोजी निर्गमित केला असून देशातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालय व संस्थांना सदर सिकल्सेल आजाराबाबत पाठ्यक्रम सहभागी करून घेणे करिता निर्देशित केलेला आहे.
कुरखेडा येथील आरोग्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रमेश कटरे मागील तीन दशकांपासून सिकलसेल या दुर्धर आजारावर कार्यरत असून त्यांनी अनेक वेळा शासन दरबारी या दुर्धर आजाराला बळी पडलेल्या आदिवासी गोरगरीब व मागासलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा काम केलेला आहे. त्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाने या रोगाचा दुर्धर आजार म्हणून वर्गीकरण स्वीकारत हे आजार जळलेल्या रुग्णांना सामाजिक पेन्शन सुद्धा सुरू केलेली आहे. सिकलसेल आजार हे अनुवंशिक असून दलित आदिवासींमध्ये याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. या आजारावर कुठल्याही प्रकारचा आजवर रामबाण उपाय शोधण्यास शास्त्रज्ञ यशस्वी झालेले नसले तरी याच्या वर्गीकरणानुसार याला बाधित ठरलेल्या रुग्णांची योग्य आरोग्य तपासणी करून येणाऱ्या पिढीला होणाऱ्या सदर रोगाचा बचाव करता येतो. या रोगा संदर्भात आर्थिक संकल्पना मध्ये विशेष आर्थिक प्रावधान सुद्धा देण्यात आल्याची घोषणा देशाचे अर्थमंत्री यांनी संसद मध्ये केलेला आहे. परंतु डॉ. रमेश कटरे हे मागील तीन दशकांपासून या रोगाला आर्थिक नाही तर जनजागृती व लोकांमध्ये या रोगाबद्दल असलेल्या गैरसमजुती दूर केल्याशिवाय याच्यातून समाजाला मुक्तता करता येत नाही असा अहवाल वेळोवेळी शासनाला प्रस्तुत केलेला आहे. त्यांच्या तीन दशकापासून सुरू असलेल्या या प्रयत्नाचे फलित झालेला आहे. सदर अभ्यासक्रम तयार होवून संपूर्ण देशात या दुर्धर आजार बाबत शालेय जीवनापासूनच जाणीव जागृती करण्यास मदत होणार आहे.
“डॉ. रमेश कटरे यांनी मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.”
सिकलसेल या आजाराबाबत अरोग्याधम या संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात तीन दशकांपासून कार्यरत असलेले डॉ. रमेश कटरे यांनी प्रत्यक्षात लोकांमध्ये काम करतांना ही जाणीव झाली होती की या रोगांवर नियंत्रण ठेवायचा असेल तर या बाबत समाजात जाणीव जागृती खूप आवश्यक आहे. जाणीव जागृतीचा प्रभावी माध्यम शालेय पाठ्युस्तकात समावेश करूनच होवू शकतो असे कळताच त्यांनी शासन दरबारी याचा पाठपुरावा केला. नियमित केल्या पाठपुराव्याला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी सकारात्मक साथ देत विश्वविद्यालय अनुदान आयोग कडे पाठपुरावा केला. विषयाचे गांभीर्य व देशातील दलित आदिवासींचे या रोगामुळे होणारे शोषण लक्षात घेता युजिसी ने निर्णय घेत देशातील सर्व विद्यापीठांना अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. आता लवकरच हा अभ्यासक्रम पाठ्यक्रम म्हणून संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार आहे.
डॉ. रमेश कटरे यांनी दिलेले ५ मुद्दे आधारावर तयार होईल पाठ्यक्रम.
सिकलसेल आजारावर शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करण्याकरिता डॉ. रमेश कटरे यांनी पुढील पाच मुद्यांच्या आधारे पाठ्यक्रम करावा असा प्रस्ताव दिला आहे.
1. सिकलसेल रोग म्हणजे काय. त्याची कारणे आणि विविध प्रकार काय आहेत?
2. लाल पेशी (सिकल आकार) आणि शरीरातील हिमोग्लोबिनची सामान्य पातळी तयार करण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो?
3. उपचार न केल्यास लक्षणे (गंभीर अशक्तपणा) लक्षणे आणि गुंतागुंत काय आहेत?
4. प्रतिबंध करण्याचे उपाय काय आहेत – जोडप्यांचे विवाहपूर्व करिअर स्क्रीनिंग.
5. सिकलसेल असलेल्या मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये भेदभाव न करणे महत्त्वाचे का आहे आणि प्रतिबंधक धोरणांचे नैतिक परिणाम काय आहेत?