December 23, 2024

“त्या कंत्राटदाराला वर्षभर नियमबाह्य काम करण्याची सूट कोणत्या मोबदल्यात दिली होती याचे उत्तर नगर पंचायत प्रशासन, कर्मचारी व पदाधिकारी देणार का?”

1 min read

कुरखेडा; (प्रतिनिधी); २९मे : नगरपंचायत कुरखेडा पदाधिकारी यांचे विरोधात पैशाची देवाण घेवाण करून मनमर्जीतील कंत्रातदराला काम देण्याचा आरोप येथील कंत्राटदार खुशाल रामकृष्ण बनसोड यांनी केलेला आहे, यानंतर नगरपंचायत च्या व कंत्राटदारातील मधुर संबंधाचे कारण सर्वांच्या समोर उघड झाले आहे.

गेल्या वर्षभरापासून खुशाल रामकृष्ण बनसोडे कुरखेडा नगरपंचायत चे घनकचऱ्याचे कंत्राटदार होते व त्यांना यावेळेस दोन वेळेस मुदतवाड पण देण्यात आली आहे. नगरपंचायत कुरखेडा येथे होणाऱ्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राट दरवर्षीच विवाद असतो. या कामाला घेण्यासाठी कमालीची स्पर्धा कुरखेडा नगरपंचायत येथे बघावयास मिळते. याचाच कारण आहे की मागील वर्षी खुशाल रामकृष्ण बनसोड यांनी 32 टक्के पेक्षा कमी दरामध्ये सदर कंत्राट घेतले होते. एवढा कमी दरामध्ये कंत्राट घेतल्यानंतर काम करण्याची गुणवत्ता कशी असेल हे आपण समजू शकता. नगरपंचायत च्या निविदा मध्ये व केलेल्या करारनामा मध्ये 90 पेक्षा अधिक अटी व शर्तींचा समावेश होता परंतु प्रत्यक्षात काम करत असताना सदर कंत्राटदार हा, “मी सत्तेचा भागीदार आहे”, या मगरुरी भावनेने मिरवणाऱ्या खुशाल रामकृष्ण बनसोड यांनी कामाची गुणवत्ता कधीच टिकवून ठेवली नाही. याचा प्रत्यक्ष उदाहरण जर बघावयाचा असेल तर नगरपंचायत कुरखेडा यांनी सती नदीच्या किनारी तयार केलेल्या क्षेपण भूमीची अवस्था आपण बघू शकता. घराघरातून ओला सुका कचरा वेगवेगळ्या करण्याच्या अटी शर्तीवर देण्यात आलेल्या सदर कंत्राटदारांमध्ये किती वर्गीकृत कचरा गोळा झाला व किती खात तयार झाला व क्षेपणाभूमीची काय स्थिती आहे हे आपण समजू शकता.
सर्व नियम धाब्यावर बसून काम करणाऱ्या या कंत्रालदाराला वर्षभर व परत पुढे दोन महिन्याच्या वाढीव मुदत कोणत्या मोबदल्यात देण्यात आली हे नगरपंचायत कुरखेडा येथील पदाधिकारी, कर्मचारी व अधिकारी यांनी सांगावे. गावातील लोकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या कामात करारनाम्यात नमूद अटी व शर्ती पालन कार्याची शिस्तीत का ठेवली गेली नाही हा मोठा प्रश्न आता उपस्थित होवू लागलाय. एकंदरीत कंत्राटदारांसोबत आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय या पद्धतीने आणि एवढी मोकळी व मनमानी ची सूट कदापि कोणीच देणार नाही. एकंदरीत या सर्व कंत्राटदारांमध्ये नगरपंचायत येथील आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. पण कुरखेडा नगरपंचायत येथील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची वागणूक व मानसिकता कशी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. या विशेष कामाकरिता राज्य शासनाकडून एक विशेष शहर समन्वयकाची सुद्धा नियुक्ती आहे. गावात होऊ घातलेल्या स्वच्छतेच्या कामात त्याचा मोलाचा वाटा असतो. परंतु सत्तेच्या व पदाधिकाऱ्यांच्या दबावात त्यांना इथं काम करावे लागतात याचाच परिणाम असा आहे की त्यालाही चुकीचा दिसणारा काम प्रत्यक्षात बोलून दाखवण्याची मुभा नाही. अनेक वेळा सदर कंत्राटदाराचे देयक अदा करतांनी या शहर समन्वयकाचे अभिप्राय अहवाल महत्त्वाची भूमिका पार पडते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर शहर समन्वयक समीर नंदेश्वर यांनी कामाबद्दल असलेली त्रुटी, उणीव व गुणवत्ता यासंदर्भात अहवालात माहिती नमूद करून सुद्धा कसलाही दंड व शिस्त या कंत्राटदारला करण्यात आलेली नाही. पदाधिकारी व कर्मचारी यांनी सदर कंत्राटदाराला मोकळीच देऊन त्याला मनमर्जीने व नियमबाह्य काम करण्याची सूट एका पद्धतीने आर्थिक देवाण घेवाण करूनच दिलेली होती का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
नदीकिनारी होत असलेल्या घाणी संदर्भामध्ये स्थानिक लोकांच्या तक्रारीवरून नगरपंचायत येथे आंदोलन करणाऱ्या काही लोकांना पोलिस कोठडीमध्ये टाकण्याचाही काम या घनकचऱ्याच्या नियमबाह्य कामा वर परदा टाकण्याकरिता झालेला आहे. याच कंत्राटदाराने नगरपंचायत पदाधिकारी यांना हाताशी धरून त्यांच्या भरवशावर कुरखेडा येथील पोलीस स्टेशनला एका पत्रकार व गावातील चार सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची हिम्मत दाखवली होती. याच नगरपंचायत च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी रात्री बारा वाजता कुरखेडा पोलीस स्टेशन येथे जाऊन याच कंत्राटदाराच्या बाजूने जोरदार चढाई करत तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय अष्टेकर यांच्यावर दबाव टाकून गुन्हा नोंद करून या पाच लोकांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवले होते. गंभीर दुखापत न झालेल्या याच खुशाल बनसोड ला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूनेश्वर खुणे यांचे वयक्तिक नाते संबंधाचा फायदा घेऊन खोटी रिपोर्ट तयार करून मदत केली होती.
नगरपंचायतचा कंत्राट देतानी स्टॅम्प पेपर वर लिहून घेतलेल्या अटी व शर्तीचा पालन किती प्रमाणात केला जातो व त्या अटी व शर्तीत ढील देण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात हे कंत्राटदार व पदाधिकारी यांनाच माहीत असावे. नगरपंचायत च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळेस कंत्राटदाराच्या विरोधात बदनामी केल्याचा फौजदारी दाखल करण्याची हिम्मत दाखवली आहे. हीच हिम्मत एखाद्या कंत्राटदाराला कंत्राट देताना करारनामा नुसार केलेल्या अटी शर्तीचे पालन करण्यासाठी दाखवली तर गावात स्वच्छतेच्या कामाला न्याय मिळेल.
कुरखेडा नगरपंचायत येथील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटावरून सुरू झालेले नाट्यमय घटना वर कोण व कसा पडदा पाडतो हा येणारा वेळच सांगेल. परंतु स्वार्थासाठी व पैशाच्या हौशीपोटी माणूस कुठल्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचेल हे समजून घ्यायचे असेल तर कुरखेडा नगरपंचायत येथे सुरू असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते कंत्राटदार विवाद उत्तम उदाहरण आहे.

About The Author

error: Content is protected !!