“कामावर नसलेल्या लोकांच्या नावे घनकचरा व्यवस्थापन कामाचे ईपीएफ भरून देयके सादर करणे कंत्राटदाराच्या अलगट येणार”
1 min read“नगर पंचायत प्रशासन आक्रमक मोड मध्ये, खोटे आरोप करून बदनामी करणाऱ्या खुशाल बनसोड यांना सदर प्रकरण चांगलेच भोवणार असल्याची जोरदार चर्चा”
कुरखेडा; (प्रतिनिधी); २८ मे: घनकचरा व्यवस्थापन देयकासोबत बनावट ईपीएफ सादर केल्या प्रकरणी खुशाल बनसोड यांच्यावर सन २०२२-२३ चे घनकचरा व्यवस्थापन करारनाम्याच्या अटी व शर्ती भंग करून नगर पंचायत सोबत धोका-धडी केल्या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्याची तयारी असल्याची माहिती येथील आरोग्य व स्वच्छता सभापती अतुल झोडे यांनी सदर प्रतिनिधी यांचेशी चर्चा करतांना सांगितले आहे.
नगरपंचायत पदाधिकाऱ्यांचे विरोधा जाचक अटी नियम व शर्ती लावून स्वामार्जीच्या कंत्राटदाराला पैशाचा देवाण-घेवाण करून कंत्राटदार देण्याचा डाव असल्याचा आरोप खुशाल बनसोड यांनी लेखी निवेदनादवारे केला होता. खुशाल बनसोड यांनी केलेले आरोप फेटाळत सदर प्रकरणात पदाधिकाऱ्यांची व नगरपंचायत ची बदनामी केल्याचा आरोप येथील नगराध्यक्ष अनिता बोरकर यांनी केला होता. यांच्या विरोधात बदनामी केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी बोलले होते. आज रविवार रोजी नगरपंचायत येथील सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशन कुरखेडा येथे जाऊन लेखी फिर्याद दाखल केले असल्याची माहिती आहे. एकूण 17 नगरसेवक व एक स्वीकृत सदस्य अशा एकूण 18 लोकांनी सदर फिर्यादीवर हस्ताक्षर केले असले तरी काँग्रेस कोट्यातून स्वीकृत सदस्य असलेल्या आशाताई तुलावी यांनी स्वतःला या पूर्ण प्रकरणातून अलिप्त ठेवल्याची माहिती आहे. त्यांनी सदर फिर्यादीचे प्रत वर स्वाक्षरी देण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. कुरखेडा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या लेखी फिर्यादीनंतर पोलीस अधिकारी कुठल्या कलमाखाली गुन्हा नोंद करतात व खुशाल बनसोडे यांच्यावर काय कारवाई होते तो येणारा वेळ सांगेलच.
यासोबतच आता या प्रकरणात अजून एक नवीन बाब प्रखरपणे समोर आली असून 2022 – 23 आली सदर कामाचे कंत्राट खुशाल बनसोड यांच्या नावे होते. त्यांनी नगरपंचायत कुरखेडा येथे सादर केलेल्या देयकासोबत बनावट स्वरूपाची ईपीएफ भरण्याची माहिती येथील आरोग्य व स्वच्छता सभापती अतुल झोडे यांना पाहणीत लक्ष्यात आली असून कामावर नसलेल्या लोकांचे नावे ईपीएफ भरणा करून खोटे चालान जोडले आहे. या प्रकरणात सदर कंत्राटदार चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे.