December 23, 2024

लंडन येथील जागतिक परिषदेत गडचिरोलीच्या गोंडी शाळेवर चर्चा:ॲड बोधी रामटेकेंचा सहभाग

1 min read

 

गडचिरोली: २७ जून : लंडन येथे नुकतीच जागतिक ‘मानववंशशास्त्र व शिक्षण’ परिषद पार पडली. यात विविध विषयांवरील संशोधन सादर करण्यासाठी जगभरातील अभ्यासक उपस्थित होते.

भारता सारख्या पूर्ववसाहती देशात अस्तित्वात असलेलेआ दिवासी निवासी शाळा आणि त्यात रुजत चाललेला वसाहती दृष्टीकोन म्हणजेच एकंदरीत आदिवासीकेंद्रीत नसलेल्या शैक्षणिक व्यवस्थेमुळे जगभरातील आदिवासी समाजाचे होणारे सामाजिक- सांस्कृतिक शोषण हा सुद्धा या परिषदेतील प्रमुख चर्चेचा विषय होता. यात ॲड बोधी रामटेके यांनी गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाने सुरु केलेल्या गोंडी माध्यम शाळेवर केलेले संशोधन मांडले.ॲड बोधी रामटेके हे मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील असून, सध्या युरोपियन सरकारच्या इरॅसमस मुंडूस शिषवृत्तीच्या माध्यमातून युरोप खंडात चार देशातील नामांकित विद्यापीठात कायद्याचे उच्च शिक्षण घेत आहेत.

स्वतंत्र भारतातील शैक्षणिक धोरणे आदिवासी समाजाच्या गरजा लक्षात न घेता त्यांच्यावर सरसकट थोपवल्या आहेत, ज्यामुळे आदिवासी समाज त्यांच्या भाषा, संस्कृती, परंपरे पासून दूर केले; जात आहे. भाषा, संस्कृती नष्ट होणे म्हणजे, त्या समाजाचे अस्तित्व धोक्यात येणे होय. ‘मागास, असंस्कृत किंवा जंगली’ असा आदिवासी समाजाला घेऊन असलेला दृष्टीकोन, अद्याप कायम आहे, असे मत त्या परिषदेत रामटेके यांनी मांडले. पुढे आदिवासी समाजाला पूरक नसलेल्या शैक्षणिक धोरणांना आव्हान देत, आदिवासी विकासासाठी एक आदर्श शैक्षणिक प्रणाली म्हणून गडचिरोलीच्या मोहगावातील गोंडी शाळा कश्याप्रकारे उभी राहिलेली आहे यावर भाष्य केले.

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे २०१९ साली ग्रामसभांनी एकत्रित येऊन ‘पारंपरिक कोया ज्ञानबोध गोटून’ या शाळेची स्थापना केली. ज्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणात गोंडी भाषेत प्राथमिक शिक्षण दिले जात आहे. संविधानातील अनुच्छेद ३५० (अ) अन्वये मातृभाषेत शिक्षण देण्याबाबतची जबाबदारी शासन व्यवस्थेवर सोपावली आहे. या सोबतच ग्रामसभांना पेसा किंवा वनहक्क कायद्याअंतर्गत त्यांची संस्कृती, भाषा संवर्धन करण्याचा सुद्धा अधिकार आहे. ज्याचा वापर करत ही शाळा अस्तिवात आली. अधीकारांच्या कक्षेत राहून सुरु असलेल्या शाळेला २०२२ साली शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत ‘अवैध किंवा अनधिकृत’ ठराविण्यात आले.

शाळेच्या स्थापनेपासून तर त्यांना अवैध ठरविल्या नंतरन्या यालयाच्या माध्यमातून सुरु असलेला लढ्याबाबतच्याए कूणच संघर्षाबाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली. पूढे रामटेके सांगतात की, कॅनडा व जगभरातील अभ्यासकांनी अनेक दाखले देत सिद्ध केले की, सांस्कृतिक वातावरणात, मातृ भाषेतून शिक्षण दिल्यास त्या समाजाचा एकंदरीतच विकास होतो. परंतु तसे न करता शाळेला अनधिकृत ठराविणे असंविधानिक असल्याचे मत रामटेके यांनी मांडले.

मोहगाव ग्रामसभेचे देवसाय आतला, बावसू पावे, शिक्षकशे षराव गावडे व इतर सदस्य व शिक्षकांचा परिषदेत उल्लेख झाला. गोंड आदिवासी समाजाच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमाची जगभरातील अभ्यासाकांनी प्रशंसा करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.

About The Author

error: Content is protected !!