“अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता स्पर्धा पूर्व प्रशिक्षण” , “29 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे”
1 min readगडचिरोली,दि.27(जिमाका): जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने एम.पी.एस.सी., आयबीपीएस, एसएससी तसेच जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे.
प्रशिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या पात्र उमेदवारांनी 1 जुलै ते 29 जुलै पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.2 गडचिरोली येथे अर्ज सादर करावयाचे आहे. 30 जुलै 2024 रोजी मुलाखत घेण्यात येईल.
पूर्व प्रशिक्षण प्रवेश पात्रतेसाठी शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने असून प्रशिक्षणदरम्यान एक हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. अधिक माहीतीसाठी 8485814488 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.