December 22, 2024

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

1 min read

गडचिरोली, जुलै २३ :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या भामरागड व एटापल्ली तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, राज्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे व त्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना विभागाचे दिनांक 31 मार्च, 2005 चे शासन निर्णयानुसार आयुक्तालय स्तरावर राबविण्यात येत आहे. तसेच दिनांक 07 मार्च, 2024 च्या शासन निर्णयान्वये कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रुपये 8.00 लाखपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्युएस वर्ल्ड रैंकींग (QS World Ranking) 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील अशा विद्यार्थ्यांना

प्रतीवर्षी परदेश शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

राज्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणेसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात परदेशात अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणेसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसुचित जमातीच्या इच्छुक विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

राज्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी खालील नमुद पदवी/पदव्युत्तर शिक्षणासाठी/ अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल.

एम.बी.ए- पदव्युत्तर, वैद्यकिय अभ्यासक्रम-पदवी/पदव्युत्तर, बी.टेक (इंजिनिरींग)- पदवी/पदव्युत्तर, विज्ञान- पदवी/पदव्युत्तर, कृषी पदवी/ पदव्युत्तर, इतर विषयाचे अभ्यासक्रम- पदवी/पदव्युत्तर.

वरील अभ्यास क्रमाकरिता अर्ज सादर करण्याकरिता व अधिक माहिती करीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क साधावा. सदर परदेशी शिष्यवृत्तीकरीता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली आदित्य जीवने, यांनी केलेले आहे.

About The Author

error: Content is protected !!