December 23, 2024

किशोरवयीन बालकांवर होणारे अत्याचार रोखण्य संदर्भात मार्गदर्शन शिबीर संपन्न; कुरखेडा पोलीस स्टेशनचा उपक्रम

1 min read

कुरखेडा, सप्टेंबर ०३ :  आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे पोलीस स्टेशन कुरखेडाच्या वतीने दिनांक ३१/०८/२०२४ रोज शनिवार ला किशोरवयीन बालकांच्या अत्याचारा संदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी किशोरवयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, किशोरवयीन बालकांनवर अत्याचार होत असताना अत्याचार सहन न करता अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी तात्काळ आपण आपल्या आई वडिलांना व गुरू जनांना अथवा पोलीस स्टेशन येथे येवून संपर्क साधून, घडलेल्या प्रसंगाची माहिती देऊन दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले.
लैंगिक शिक्षण दुर्लक्षित असल्यामुळे अशा घटना जवळच्याच व्यक्ती कडून किशोरवयीन बालकांनवर अत्याचार होत असून सोशल मीडियाचा गैर वापर तसेच घाणेरड्या मोबाईल वरील क्लिप दाखवणे सुद्धा गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी विविध उदाहरणे देत अत्याचार कशाप्रकारे होत असतात याची माहिती किशोरवयीन विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी व्यासपीठावर‌ संस्था कोषाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये,प्राचार्य नागेश्वर फाये, पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे प्रा. विनोद नागपूरकर,‌ उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे यांनी गुड टंच व बॅट टंच यावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना माहिती पटवून दिली.
यावेळी प्राचार्य, नागेश्वर फाये यांनी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांन करिता विविध समित्या गठीत केल्या गेले असून त्यांची माहिती किशोरवयीन विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विनोद नागपूरकर यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य, नागेश्वर फाये यांनी केले तर आभार प्रा.प्रदीप पाटणकर यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राध्यापिका अश्विनी फाये, प्राध्यापिका रागिनी दखणे ‌ प्राध्यापिका कवाडकर ,प्राध्यापिका नंदिनी कोटांगले, प्राध्यापिका प्रियंका उईके ,प्राध्यापिका स्नेहा दहीकर,प्रा. सत्यम फटीग ,लिपिक हरीश तेलका, व स्वप्नील खोब्रागडे ,किशोर बनसोड,शिपाई युवराज कुथे यांनी सहकार्य केले.

About The Author

error: Content is protected !!