December 23, 2024

अष्टपैलू शिक्षक नरहरी माकडे यांचा सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार

1 min read

*आ.ग्रा.वि.शि. संस्था तथा शिक्षक वर्ग व सगेसोयरे व मित्रमंडळी यांच्या वतीने जाहीर सत्कार*

कुरखेडा, सप्टेंबर ०३ : आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा द्वारा संचालित श्रीराम विद्यालय कुरखेडा येथील अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी नरहरी सदाशिव माकडे हे नियतकालमानाने दिनांक ३१/०८/२०२४ रोज शनिवार ला सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा येथील पदाधिकारी तथा श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व नातेवाईक तथा ‍मित्रमंडळी यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य नागेश्वर फाये, प्रमुख अतिथी संस्था सचिव दोषहरराव फाये, शाळा समिती सदस्य चांगदेव फाये,विनायक विद्यालय विसोरा येथील मुख्याध्यापक भोजराज ठाकरे, सेवानिवृत्त सैनिक बाबुरावजी माकडे , बळीरामजी माकडे,प्राचार्य गोबाडे,सेवानिवृत्त प्राचार्य ,लीलाधर बडवाईक, सेवानिवृत्त प्राचार्य घनश्याम सोनूले,सेवानिवृत्त मुख्याध्यापक नानाजी खुणे,पुंडलिक नेवारे महाराज, सुधाकर माकडे, ‌हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी अष्टपैलू कलावंत शिक्षक नरहरी माकडे यांच्या ३२ वर्षाच्या अध्यापन कार्यातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या शैक्षणिक सामाजिक, धार्मिक, व झाडीपट्टी नाट्य रंगभूमीवरील कलावंत शिक्षक म्हणून विविध भूमिका वटवणाऱ्या अष्टपैलू कलावंत शिक्षक नरहरी माकडे यांना पुढील आयुष्य करिता त्यांना संस्था पदाधिकारी,आप्तसवकीय नातेवाईक ,मित्रमंडळी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देताना नरहरी माकडे यांनी आपल्या कार्यकाळातील अनेक प्रसंगांना उजाळा देत आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व सहकारी शिक्षक व त्यांचे बंधू मित्रमंडळी व नातेवाईक यांचे आभार मानून तुमचा स्नेहरुपी आशीर्वाद माझ्या कुटुंबावर नेहमी राहो अशी त्यांनी प्रार्थना केली.
सेवानिवृत्ती पर सत्कार व नियमित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.विनोद नागपूरकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. प्रदीप पाटणकर यांनी केले तर आभार शिरपूरवार यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येत नरहरी माकडे व परिवारावर प्रेम करणारे आप्तस्वकीय नातेवाईक मित्रमंडळी व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!