April 28, 2025

श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद

कुरखेडा, २३ डिसेंबर,; आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीराम कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील विद्यार्थ्यांनी एकदिवसीय शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून गोसेकृत प्रकल्प येते भेट देऊन तेथील माहिती समजून घेतली गोसीकृत प्रकल्पामधून 32 दरवाजा मधून सोडण्यात येणाऱ्या पाण्या संदर्भात व पावसाळ्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील नद्यांना येणारा पुर या संदर्भात संपूर्ण माहिती समजून घेतली तथा कराडला टायगर वाटर पार्क येथे जाऊन मनमुराद आनंद लुटला यावेळी प्राचार्य, नागेश्वर फाये यांच्या मार्गदर्शनात प्रा. प्रदीप पाटणकर प्रा. विनोद नागपूरकर प्राध्यापिका आरती कवाडकर प्राध्यापिका नंदिनी कोटांगले लिपिक हरीश टेलका स्वप्निल खोबरागडे ईश्वर बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद लुटला. यावेळी विद्यार्थ्यांनी संस्थेचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे मनापासून आभार मानले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!