चार महिन्यापासून रोजगार सहाय्यक मानधनाच्या प्रतीक्षेत
1 min readकुरखेडा, २३ डिसेंबर : गावातील नागरिकांच्या हाताला काम मिळावा याकरिता रोजगार सहाय्यक हा तन मनाने काम उपलब्ध करून देण्याकरिता प्रामाणिकपणे प्रयत्न करुन गावातील मजुरांना काम उपलब्ध करून देतो मजुरांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना तात्काळ मिळावा याकरिता सर्व प्रोसेस तयार करून सतत प्रयत्नशील राहून मजुरांच्या खात्यात पंधरा ते एक महिन्यापर्यंत केलेल्या कामाचा मोबदला त्यांना मिळवून देत असतो परंतु जो रोजगार सहाय्यक इतरांना रोजगार उपलब्ध करून देतो त्यांना कामाचा मोबदला मिळवून देतो त्याच रोजगार सहाय्यकाला काम करून जर चार चार महिने त्यांना मानधन मिळत नसेल तर काम करून काय अर्थ असा प्रश्न जिल्ह्यातील रोजगार सहाय्यक करीत आहेत.
मागील चार महिन्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार सहायकाच्या खात्यात मानधन जमा न करण्यात आल्याने रोजगार सहायकाच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली असून चार महिन्यापासून उसने उदार वारी कडून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत याकरिता मायबाप महायुतीच्या सरकारने तात्काळ रोजगार सहायकांच्या खात्यात चार महिन्याचे रखडलेले मानधन तात्काळ जमा करुन रोजगार सेवकांना दिलासा देण्यात यावा अशी एक मुखी मागणी जिल्ह्यातील रोजगार सहायकाने केली आहे. त्याचप्रमाणे महायुती सरकारने रोजगार सहायकांना घोषित केलेल्या ८००० रुपये मानधनाचा प्रस्ताव तात्काळ अंमलबजावणी करून येत्या दोन महिन्याचे पैसे सुद्धा रोजगार सहायकांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावे अशी सुद्धा मागणी आदिवासी बहुल जिल्हा असलेला गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार सहायकाने प्रशासनाकडे मागणी केली आहे.