मावळत्या वर्षाला रक्तदान करीत कुरखेडा येथील यूवकांनी दिला निरोप
1 min readकूरखेडा , ३१ डिसेंबर: वर्षाचा शेवट व नविन वर्षाची सूरवात हूल्लडबाजीने न करता सामाजिक उपक्रमाने करण्याचा बेत आखत स्व.विक्रांत वारजूरकर व स्वर्गीय जिग्नेश धंधूकीया यांचा स्मृती निमित्त जय विक्रांता व जिग्नेश क्रिकेट क्लब डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कुरखेडा द्वारे आज दि.३१ डिसेंबर रोजी येथील सिंधी भवनात आयोजित रक्तदान शिबीरात २० यूवकानी रक्तदान करीत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. विशेष म्हणजे मागील १५ वर्षापासून येथील यूवक मंडळी रक्तदानाने मावळत्या वर्षाला निरोप देण्याची परंपरेचे पालन करीत आहेत.
पाश्चात्य संस्कृतिचा प्रभावात नविन यूवकांची पीढी नविन वर्षाचे स्वागत करताना मर्यादेचे उल्लंघन करीत व्यसनाधिनतेत गूरफळत आहेत या वाईट परंपरेला फाटा देण्याकरीता मागील १५ वर्षापासून येथील काही सामाजिक कार्यकर्ते वर्षाचा अंतिम दिवशी रक्तदान सारखे सामाजिक उपक्रम राबवत यूवकाना सत्कार्याकडे प्रवृत करीत आहेत आज आयोजित रक्तदान शिबीराला माजी आमदार कृष्णा गजबे , माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे , प्रा. कीशोर खोपे , गणपत सोनकूसरे, नगरसेवक अतुल झोडे, उमेश वालदे , रूग्न कल्याण समीतीचे सदस्य विवेक निरंकारी, सिराज पठान कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक सागर निरंकारी, डॉ.जगदिश बोरकर, देवेन्द्र फाये, नसीर हाशमी , उल्हास देशमुख, दीपक धारगाये, प्रा. नागेश फाये, प्रा विनोद नागपूरकर, यशपाल सहारे , पंकज टेंभूर्णे , विनायक ठाकरे, नौशाद सय्यद , प्रवेश सहारे, सोनू रहांगडाले , मयूर सहारे , शिवम जुमनाके उपस्थीत होते यावेळी शिबीरात जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथील रक्त संक्रमण अधिकारी डॉ.मुकुंद ढबाले
प्रयोग शाळा तंत्रज्ञ अजय ठाकरे धीरज ठेवले प्रमोद देशमुख बंडू कुंबरे नयनतारा मोहूर्ले,निखिल उंदिरवाडे .उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील डॉ.जगदीश बोरकर,डॉ.प्राजक्ता दुपारे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रश्मी मोगरे,कल्पना भट्ट यानी सेवा बजावली तर पूजा मिस्त्री या यूवती सह शिवराम बूक्का ज्ञानेश्वर कागदे प्रितम वालदे शोएब पठान विद्यासागर निरंकारी कैलाश उईके निखीलसिंग चव्हाण यश सोनकूसरे विशाल लांजेवार दिपक आत्राम निखील वसाके चेतन नरोटे हंसराज वानखेडे नितेश लांजेवार मधूसूदन नेवारे यदूनाथ नेवारे शाहीद हाशमी विनोद लोहबंरे रोहीत नखाते यानी रक्तदान करीत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली