दारू ला नाही म्हणत इंग्रजी वर्षाचे स्वागत करा, मुक्तीपथ चा स्तुत्य उपक्रम
1 min readकुरखेडा, ३१ डिसेंबर : २०२४ या मावळत्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून ३१ डिसेंबर ला दारूला नाही म्हणा व येणाऱ्या इंग्रजी नववर्षाचे स्वागत आनंदाने करूया या जनजागृतीच्या कार्यक्रमाची रॅली श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा इथून तरुणांना प्रोत्साहित करणारे व त्यांना व्यसनापासून दूर ठेवणारे नारे देत भव्य रॅली कुरखेडा शहरातून काढण्यात आली, यावेळी रॅलीमध्ये श्रीराम कनिष्ठ व वरिष्ठ महावद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी व विद्यार्थी त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुरखेडा येथील कर्मचारी व विद्यार्थी तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी वामनरावजी फाये, अशोक जी मेश्राम प्राचार्य नागेश्वर फाये,महिला व समाजसेविका कविताताई खडसे ,विमलताई गुंडरे कमलताई मेश्राम, उर्मिला ताई बनसोड , संगीताताई जुमनाके प्रा. प्रदीप पाटणकर, प्रा विनोद नागपूरकर, प्रा सत्यम फटिंग, प्रा.ज्ञानेश्र्वर देशमुख,प्राध्यापिका अश्विनी कावळे , रागिनी दखणे , प्रियका उईके , आरती कवाडकर,त्याचप्रमाणे शासकीयऔद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील गरदास सर लोणगोटे सर सातपुते मॅडम शेंडे मॅडम बूराडे सर वालदे सर पत्रे सर रामटेके सर इत्यादी सरांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास सहकार्य केले. व रॅली मध्ये सहभाग दर्शवला.
यावेळी माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी मुक्तिपथ च्या या कार्यक्रमाचे कौतुक करून युवकांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन केले यावेळी माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे,डॉ जगदीश बोरकर, डॉ रमेश कटरे, अँड उमेश वालदे, विवेक निरंकारी, उलास देशमुख यांनी रॅलीला भेट दिली व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पोस्टर फलक च्या माध्यमातून दारूला नाही म्हणा व येणाऱ्या वर्षाचे स्वागत आनंदाने करा असा संदेश दिला.
यावेळी पोलीस विभागातर्फ, पोलीस उपनिरीक्षक भोम्बे सर , व साबले सर, मुक्तीपथ तर्फे सौ शारदा जे मेश्राम तालुका संघटक त्याचप्रमाणे जीवनजी दहीकर तालुका प्रेरक व स्पार्क कार्यकर्ते महेश खोब्रागडे हे उपस्थित होते.
योगायोग….
“कधी कधी फोटो खूप प्रासंगिक निघून जातात. या फोटो मधे नेमका तोच घडला आहे. कुरखेड्यात मुख्य मार्गावर ज्या दुकान गाळ्यातून सर्रास बिनधास्तपणे दारू विकली जाते नेमकं त्याच दुकानासमोर दारूला नाही म्हणा असा बॅनर घेवून मुक्तीपथची रॅली निघाली आणि हे स्थळ चित्रबद्ध झाले. दारुला नाही म्हणा अशी रॅली निघणार ही माहिती बहुत्तेक रॅली पूर्वीच पोहोचली असल्याने सदर अवैध दारू दुकानाचे शटर यावेळी नेमके बंद होते हे विशेष.”