January 10, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्यात, लॅायड्स मेटल्सच्या विविध उपक्रमांचे उदघाटन करणार

1 min read

गडचिरोली , १ जानेवारी: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते कोनसरी येथे लॅायड्स मेटल्सच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले जाणार आहे. नव्याने मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच गडचिरोली दौरा आहे.

गेली अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी गडचिरोलीचे पालकत्व घेण्याची ईच्छा लपवून ठेवलेली नाही. अशा स्थितीत नवीन वर्षाची सुरूवात ते गडचिरोलीच्या दौऱ्याने करणार असल्यामुळे या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

या प्रकल्पांचे होणार उद्घाटन आणि भूमिपूजन

बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लॅायड्सच्या डीआरआय प्लान्टचे उद्घाटन, लॅायड्स राज विद्यानिकेतन (सीबीएसई शाळा), लॅायड्स काली अम्माल मेमोरिअल हॅास्पिटल, लॅायड्स वन्या क्लोदिंग कंपनी, फॅमिली क्वॅार्टर्स, पोलीस अॅाफिसर्स फॅमिली क्वॅार्टर्स, जिमखाना, बालोद्यान आदींचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय स्लरी पाईपलाईन, पॅलेट प्लान्ट आणि आयरन ओर ग्राइंडिंग युनिटचे भूमिपूजन केले जाणार आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!