ऑल इंडिया धनुर्विद्या स्पर्धेत फुले महाविद्यालयाचा सुरेंद्र आगरे सुवर्णपदकाने सन्मानित
1 min readशाहीनभाभी हकीम विभागीय अधक्ष्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या शुभहस्ते सत्कार….
आष्टी, ४ जानेवारी : नुकतेच दिनांक २४ ते २७ डिसेंबर२०२४ दरम्यान ऑल इंडिया विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन कीट विद्यापीठ भुवनेश्वर ,ओडिसाया ठिकाणी करण्यात आले होते. त्यामध्ये वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील बी.ए.व्दितीय वर्षीय धनुर्धर खेळाडू सुरेंद्र राजेश आगरे याने या स्पर्धेत इंडियन राउंड मिक्स इव्हेंट मध्ये सुवर्णपदक पटकाविले. या निमित्ताने ऑल इंडिया स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली धनुर्विद्या संघाने संपूर्ण भारतातून आलेल्या पंजाब, मणिपूर, मेरठ, पुणे, चंदिगड, मुंबई, आसाम एकूण १५०० धनुर्धर खेळाडूंचां समावेश होता . चुरशीच्या लढतीत अशा बलाढ्य संघाला नमवून ध्येयावर लक्ष केंद्रित करत सुरेंद्रने आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यानिमित्ताने शाहीनभाभी हकीम नागपूर विभागीय अधक्ष्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गुणवंत धनुर्धर सुरेंद्र राजेश आगरे व रितिका चतुर यांचे कौतुक करीत अभिनंदन केले.
यावेळी वनवैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष मा.अब्दुल जमीर अब्दुल हकीम यांनी विजयी खेळाडूंचे मनोमन अभिनंदन केले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य डॉ संजय फुलझेले, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर पाचभाई, पर्यवेक्षक घाटबांधे,डॉ. रवी शास्त्रकार सर्व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा विजयी खेळाडूंचे व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक डॉ. श्याम कोरडे, सुशील अवसरमोल, रोशन सोळंके यांचेसुद्धा अभिनंदन केले.