इतलचेरू येथे तालुका स्तरीय शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलन
1 min read“मिआम चॅरिटेबल ट्रस्ट, सुरजागड इस्पात वडलापेठ चे सहकार्य”
अहेरी, ५ जानेवारी : पंचायत समिती अहेरी अंतर्गत तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक संम्मेलन दिनांक ०२, ०३ व ०४ जानेवारी २०२५ या कालावधीत जि. प. उच्च प्राथमिक शाळा, ईतलचेरूच्या पटांगणावर संपन्न झाले.
या संमेलनाचे उद्घाटन चिंतल पेठ चे पोलीस पाटील निरंजन दुर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून ग्रामपंचायत सरपंच सैलू मडावी, गुरु मडावी मिआम चॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी रोहित तर्रेवार, पंकज पोटे सुरजागड इस्पात चे संतोष आत्राम, रुपेश तोंबरलावार आदी.उपस्थित होते.
शालेय स्तरावर विदयार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला-क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी अश्या प्रकारच्या संमेलनाची आवश्यकता असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
सदर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीतील सर्व वरिष्ठ पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक वृंद ,खेळाडू विद्यार्थी वर्गाची प्रामुख्याने उपस्थिती होती.