April 28, 2025

‘एचएमपीव्ही’ चा गडचिरोलीत एकही रुग्ण नाही,दक्षता बाळगण्याचे आवाहन -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके

गडचिरोली, ९ जानेवारी ८ : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस ( एचएमपीव्ही) विषाणूपासून आजारी पडल्याची एकही नोंद गडचिरोली जिल्ह्यात नसल्याचा खुलासा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी केला आहे.

एचएमपीव्ही हा सामान्य विषाणू असून यामुळे श्वसन मार्गाच्या वरील भागात संसर्ग होऊन सर्दी खोकला व ताप येत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी त्याची भिती न बाळागता या संसर्गापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडू देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गपासून बचाव करण्यासाठी खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा तोंड आणि नाक, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे, साबण आणि पाण्याने आपले हात वारंवार धुणे. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहने व मास्क वापरणे, भरपूर पाणी प्यावे, पौष्टिक अन्न खाणे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याचे त्यांनी सांगितले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!