April 26, 2025

‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.१२: ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ पुरस्कारासाठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ अंतिम निर्णय हा सर्वांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवन येथे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी या बैठकीला माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालया च्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य डॉ. अनिल काकोडकर, दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य अॅड उज्ज्वल निकम,श्री.वासुदेव कामत, श्री.उपेन देवूलकर, प्रा.शशिकला वंजारी यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणा-या तसेच त्याव्दारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीला देण्यात येतो. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ पुरस्कारासाठी शासनाला प्राप्त शिफारस प्रस्तावापैकी एकाची निवड करणे अत्यंत कठीण काम आहे. पुरस्कार निवड समिती सदस्यांनी सुचविलेले नाव लक्षात घेतली असून लवकरच हे पुरस्कार सर्वांशी विचारविनिमय करून जाहीर करण्यात येतील असे सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी याबाबत सादरीकरण केले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य यांनी पुरस्कारासाठी कोणाची निवड करायची याबाबत आपली मते मांडली.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!