April 26, 2025

गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात 500 कोटींचा निधी मंजूर

गडचिरोली दि. 12 : जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनीक यांनी नुकत्याच झालेल्या गडचिरोली दौऱ्यात यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीची गरज अधोरेखित करत निधी मंजुरीची जोरदार मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता हे रस्ते लवकरच विकसित होणार आहेत.

*रस्ते मजबुतीकरण प्रकल्प:*

1. चंद्रपूर-लोहरा-घंटाचौकी-मुल-हरंग hatt-चामोर्शी-घोट-मुलचेरा-अहेरी-वेंकटरापूर-बेजूरपल्ली ते MSH 9 (राज्यमार्ग 370) रस्त्याचे मजबुतीकरण

कि.मी. 34/670 ते 49/500 (ता. चामोर्शी)
मंजूर रक्कम:२०० कोटी

2. मुढोली-लक्ष्मणपूर-येणापूर-सुभाषग्राम रस्त्याचे मजबुतीकरण (MDR-16)

कि.मी. 0/00 ते 25/000 (ता. चामोर्शी)
मंजूर रक्कम:११५ कोटी
3. परवा-केळापूर-वणी-वरुड-नागभीड-भ्रम्हपुरी-वडसा-कुरखेडा-कोर्ची ते राज्य सीमा (राज्यमार्ग 314) रस्त्याचे मजबुतीकरण
कि.मी. 132/200 ते 144/400 (ता. कोर्ची)
मंजूर रक्कम:९४ कोटी ९१ लाख

*पूल बांधकाम प्रकल्प:*

4. राज्यमार्ग 380 वर पूल बांधकाम

कि.मी. 95/000 ते 114/000 (ता. एटापल्ली)

पूल स्थाने: 117/000, 115/400, 105/550
मंजूर रक्कम:२७ कोटी

5. राज्यमार्ग 380 वर पूल बांधकाम (एटापल्ली तालुका)
कि.मी. 110/200
मंजूर रक्कम:५५ कोटी

6. MSH-09 ते कमलापूर-दमरंचा-मन्येराजाराम-ताडगाव-कांडोली रस्त्यावर बांधिया नदीवरील पूल व संरक्षण भिंत बांधकाम
कि.मी. 3/035 (ब्लॉक भामरागड)
मंजूर रक्कम: ३ कोटी

7. MDR-23 वर लंबीया नदीवरील पूल व संरक्षण भिंत बांधकाम
कि.मी. 5/300
मंजूर रक्कम:२ कोटी ५९ लाख

8. झिंगानूर-वादाडेली-येडसिली-कल्लेड-कोजेड-डेचाळी रस्त्यावर येडरंगा वेगू नदीवरील पूल व संरक्षण भिंत बांधकाम
कि.मी. 17/050 (ता. अहेरी, जि. गडचिरोली)
मंजूर रक्कम:२ कोटी ५० लाख

*विकासाच्या दिशेने मोठे पाऊल*

मुख्यमंत्री, सहपालक मंत्री यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या या निधीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते व पूल प्रकल्पांना गती मिळणार असून, स्थानिक नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. तसेच, वाहतूक सोयीस्कर होणार असून नक्षलग्रस्त भागातील विकासालाही चालना मिळेल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!