September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

३०२ च्या आरोपीस जमानत मंजूर: न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

“आरोपीच्या वतीने एड. आयेशा शेखानी यांनी युक्तिवाद केला

गडचिरोली , २९ मार्च २०२५: कुरखेडा तालुक्यातील खरकाडा येथील बहुचर्चित खटल्यात, भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३०२अंतर्गत हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीला आज गडचिरोली सत्र न्यायालयाने जमानत मंजूर केली आहे. याप्रकरणाने परिसरात खळबळ माजवली होती, कारण अकस्मात मृत्यूची मृत्यू नोंद झालेल्या प्रकरणात एक महिन्या नंतर सदर इसमाचा खून त्याच्या पत्नीने केला असा तपासात निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा होता. खटला गंभीर स्वरूपाचा होता आणियात प्रबळ पुरावे असल्याचा दावा करण्यात आला होता.

या खटल्यातील आरोपी, ३२ वर्षीय कोमल आकरे , हिच्यावर गेल्या वर्षी जुलैमध्ये आपल्या पती अविनाश आकरे सोबत झालेल्यावादातून त्याची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वादाचे कारण दारू प्राशन करून चारित्र्यवर संशय घेत मारहाण करत होता, ज्यामुळे कोमलने घटनेचे दिवशी पतीसोबत झालेल्या भांडणात पती अविनाश ने मारहाण केली का कोमलच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडला या मुळे रागाच्या भरात पती अविनाश वर लाकडी पाटीने हल्ला केला आणिडोक्यावर गंभीर दुखापत होवून अत्यधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात १५ जून २०२४ रोजी मृतकाच्या  भावाने दाखल केलेल्या तोंडी रिपोर्ट मधे असे नमूद केले होते की, दारूच्या नशेत घरी येवून त्याचा तोल गेल्याने खिडकीचा कोण किंवा चौकात पाटी याच्यावर पडून खिडकीचा कोणाचा व पाटीचा मार लागून रक्तबंबाळ होवून स्वतः मारण्यास कारणीभूत झाला आहे. यात त्यांचा कोणावरही संशय किंवा तक्रार नाही.

या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात गावातील ४० पेक्षा अधिक साक्ष नोंदविल्या नंतर दोन लोकांनी पोलिसांना बयानात सांगितले की, मृतकाचे पत्नी कोमल ने त्यांना सांगितले की तिचा पती दारूच्या नशेत असताना स्वतः काडीवर पडून दुखापत होवून मरण पावला नाही तर तो मला नेहमी प्रमाणे दारूच्या नशेत घरी येऊन माझ्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण करत होता तेव्हा माझा मंगळसूत्र तुटला त्या रागात मीच त्याला जीवाशी ठार केले आहे. अशी माहिती दिली होती.

दोन साक्षदारांच्या बयानाच्या आधारे मृतकाची पत्नी कोमलला तात्काळ अटक करण्यात आली होती आणि तिच्यावर कलम ३०२अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

आज सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, कोमलच्या वतीने एड. आयेशा शेखानी यांनी युक्तिवाद केला की, सदर घटनेत कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कुठलाही ठोस पुरावा नाही, मर्ग दाखल झाल्याच्या ४० दिवस नंतर उशीरा गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचे आणि आरोपीला दोन लहान मुली वय अनुक्रमे ७ व ९ असल्याचेही त्यांनी नमूदकेले. दुसरीकडे, सरकारी वकिल एड. कुंभारे यांनी जमानतीला विरोध करताना सांगितले की, पुराव्यांची ताकद आणि गुन्ह्याचेगांभीर्य लक्षात घेता आरोपीला जमानत देणे योग्य ठरणार नाही.

न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, काही अटींसह कोमलला जमानत मंजूर केली.

हा खटला अद्याप पूर्णपणे निकाली निघालेला नाही आणि पुढील सुनावणीच्या तारखेची प्रतीक्षा आहे. या प्रकरणावरून पुन्हा एकदाकलम ३०२ अंतर्गत जमानतीच्या निकषांबाबत चर्चा सुरू झाली आहे, कारण हा एक गैरजमानती गुन्हा मानला जातो आणि जमानतमिळणे सामान्यतः कठीण असते. तरीही, विशिष्ट परिस्थिती आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे, असेनिरीक्षकांचे मत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!