“कॅडलमार्च काढून ओरीसा येथील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना गडचिरोली आप तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली”
1 min readगडचिरोली; (प्रतिनिधी); ३ जून: – आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने ओरीसा मधे रेल्वे अपघातात 300 हुन अधिक मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना बाळकृष्ण सावसाकडे जिल्हा संयोजक गडचिरोली जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
येथील इंदिरा गांधी चौक ते विश्रामगृहातुन कॅडलमार्च करण्यात आली. मौन धारन करुन कॅडल मार्च काढण्यात आली. या भीषन अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आम आदमी पार्टीने मागणी केली आहे. यावेळी स्वराज्य यात्रेमध्ये सहभागी जिल्हा संयोजक जिल्हा सचिव यांनी कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन मौन पद यात्रा यशस्वी केली.यावेळी उपस्थित संजीव जिवतोडे जिल्हा संघटन मंत्री, डॉ देवेंद मुनघाटे शेतकरी आघाडी अध्यक्ष, मिनाक्षी खरवडे जिल्हा महिला संयोजक,दिपीका गोवर्धन जिल्हा महिला संघटन मंत्री,सोनल नन्नावरे जिल्हा महिला युवा संयोजक, संतोष कोटकर जिल्हा ओ.बी.सी.आघाडी अध्यक्ष,नामदेव पोले शहर संयोजक, हितेंद्र गेडाम कामगार आघाडी अध्यक्ष, गणेश त्रिमुखे जिल्हा सह सचिव,दिवाकर साखरे जिल्हा सदश्य,मनोज गोवर्धन,उराडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.