December 23, 2024

“पद्मश्री”, या नावाने ओळखला जाईल गुरनोली येथील हाथसडीचा तांदूळ”

1 min read

“संपूर्ण देशात झाडीपट्टी रंगभूमीला नवी ओळख व सन्मान मिळवून देणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने पुरस्कृत डॉ. परशुराम खुणे यांच्या गावातील बचत गटांनी सुरू केलेल्या हातसडीचा तांदूळ प्रकल्प मध्ये निर्मित होणारा तांदूळ आता “पद्मश्री हातसडीचा तांदूळ” ब्रँड नावाने बाजारात उपलब्ध करण्याचा बचत गटाच्या महिलांचा मानस आहे.

कुरखेडा; (प्रतिनिधी); १५ जून: गुरनोली येथील “ओमकार” महिला बचत गटाच्या महिलांनी सुरू केलेल्या हातसडीच्या तांदळाला मोठ्या प्रमाणात शहरी भागातून मागणी येत आहे. पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ आरोग्यासाठी उत्तम असतो. कुठलीही प्रक्रिया न केलेले किंवा पॉलीश न केलेले आणि हाताने सडलेले तांदूळ म्हणजे हातसडीचे तांदूळ.

स्पर्धात्मक व्यापार स्पर्धेत आपले स्थान निश्चित करण्यासाठी आता या तांदळाला ब्रँड नावाने बाजारात उतरवण्याची तयारी येथील महिला बचत गटांनी केलेली आहे. संपूर्ण देशात पद्मश्री पुरस्कार व निमित्याने प्रकाश झोतात आलेले गुरनोली गावाची ओळख पद्मश्री मुळे झाली. पद्मश्री या ब्रँड नावाने आपल्या उत्पादनाला व्यावसायिक स्पर्धेत उतरण्याचा चंग महिलांनी बांधला आहे.

हातसडीच्या निसर्गिक पद्धतीने निर्मित हातसडीच्या तांडलातून तून यातून आपल्याला प्रथिने, लोह आणि फायबर मिळतात. सुदृढ आरोग्यासोबत मधुमेह नियंत्रणासाठीही हे तांदूळ उपयोगी असल्याचे समोर येत असल्याने या तांदळाच्या मागणीत वाढ झाली आहे. कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील ओमकार महिला बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेत हा नावीन्यपूर्ण प्रकल्प उभा केला असून यामधून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी ही परिसरातील महिलांना उपलब्ध झालेली आहे.

हल्ली यंत्राच्या साह्याने भाताच्या दाण्यांवरील साल / टरफल काढून त्याला पॉलिश केले जाते. यामुळे तांदूळ व साल यांच्या मध्यात असलेले प्रथिने, लोह व फायबर, क जीवनसत्त्व यांच्यासह अनेक पौष्टिक घटक नष्ट होतात. पण तांदळाला मात्र चांगलीच शुभ्रता येते. या तांदळाची किंमतही हातसडीच्या तांदळापेक्षा कमी असते. यामुळे सर्वसामान्य माणूस पांढऱ्या तांदळाचा अधिक प्रमाणात वापर करीत असल्याचे दिसून येते. असे असले तरी यंत्र साडीच्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ आरोग्यदायी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

प्रक्रिया केल्याने प्रथिने, लोह, फायबर जाते निघून..
तांदळाच्या कोंड्यात व्हिटॅमिन बी ६ असते. पॉलीश केलेल्या तांदळात ते राहात नाही. तांदणावर यंत्राद्वारे बऱ्याच प्रक्रिया केल्याने टरफल व दाण्यांवरील असलेली पौष्टिक तत्वे नष्ट होतात.

गुरनोली येथील या महिला बचत गटांच्या प्रकल्पाला शासकीय व निमशासकीय स्तरावरून प्रोत्साहन व आर्थिक मदत उपलब्ध करून घेण्याचे निरंतर प्रयास सुरू आहेत.

About The Author

error: Content is protected !!