“रेती प्रकरणात दोषींवर तत्काळ फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याच्या मागणी करिता आमरण उपोषण सुरू”

अहेरी; अनवर शेख, (तालुका प्रतिनिधी); १५ जून: भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अशा येचली येथील इंद्रावती नदी रेतीघाटातून एकाही रेतीची उचल न करता टिपी (वाहतूक परवाना) येचली येथील दाखवून भामरागड अहेरी तालुक्यातील बांधकामात रेतीचा वापर केल्याने सदर प्रकरणांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करुन संबंधित विभागातील अधिकारी व कंत्राटदार दोषींवर तत्काळ फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याच्या मागणी करिता येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय समोर संतोष रामचंद्र ताटीकोडावार यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषण करता हे भ्रष्टाचार निवारण समिती, महाराष्ट्र राज्य, जिल्हा गडचिरोलीचा जिल्हाध्यक्ष आहे. तसेच गडचिरोली जिल्हातील वरील उल्लेखीत संस्थेमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत होणाऱ्या भ्रष्टाचाराचे काही वर्षापासून वाचा फोडीत आहे. त्यांनी काही प्रकरणाचे मा. उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका देखील दाखल केलेली आहे.
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अशा येचली येथील इंद्रावती नदी रेतीघाटातून एकाही रेतीची उचल न करता टिपी (वाहतूक परवाना) येचली येथील दाखवून भामरागड अहेरी तालुक्यातील नवनिर्माणाधिन बांधकामात रेतीचा वापर केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यात बनावट दस्ताऐवजाचा आधार घेत शासनाची दिशाभूल करीत कोट्यावधीचा महसूलला चुना लावण्यात आला होता. या प्रकरणी भामरागड तहसिलदारांनी काही रेतीचा अवैधसाठा केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली होती. मात्र या प्रकरणी महसूल विभागाच्या कोणत्याही अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई न झाल्याने सदर प्रकरण थंडबस्त्यात तर टाकण्यात आले नाही ना..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षात येचली येथील इंद्रावती नदी रेती घाटाचा लिलाव करण्यात आला होता. नियमानुसार 2120 ब्रास रेती उपसा करण्याचे आदेश होते. मात्र संबंधित कंत्राटदानाने नदीपात्रातून रेतीचा उपसा न करता भामरागड अहेरी तालुक्यातील नवनिर्माणाधिन कामासाठी चोरट्या मार्गाने रेतीचा वापर करुन येचली येथील रेती असल्याचा दिखावा करण्यात आला.
संबंधित विभागाच्या बनावट दस्ताऐवजाचा आधार घेत सदर प्रकार करण्यात आला होता. या प्रकरणी 2120 पैकी भामरागड तहसिलदारांनी केवळ 563 ब्रास रेतीचा अवैध साठा ठेवल्या प्रकरणी 1 कोटीवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यामुळे मला उपविभागीय पोलिस अधिका-यांकडे तक्रार करीत सदर प्रकाराची सखोल चौकशी करुन शासनाला कोट्यवधीचा चुना लावणा-या संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांवर व कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली होती.
मात्र त्यानंतर याबाबत कुठलीही कार्यवाही न झाल्याने सदर प्रकरण थंडबस्त्यात टाकून संबंधित अधिकारी कर्मचा-यांना अभय दिल्या जात असल्याने 14 जून पासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.