“कोंदावाही येथे माजी आमदार आत्राम यांच्या उपस्थितीत गोटूल भूमीत तीन दिवसीय पारंपारिक आदिवासी देवी देवतांची पूजा कार्यक्रम संपन्न”
1 min readएटापल्ली;(अन्वर शेख) प्रतिनिधी; १५ जून: तालुक्यातील कोंदावाही येथील गोटूल भूमीत दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा पावसाळ्याच्या सुरुवातीला तीन दिवसीय देव पूजन व विज्जा तपेर पूजा कार्यक्रम भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या पूजा कार्यक्रमात कोंदावाही पारंपारिक इलाका पट्टीतील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते क्षेत्रातील जनता सुखी व समाधान रहावे,शेतकऱ्यांचा उत्पन्नात वाढ होऊन सुजलाम-सुफलाम व्हावे म्हणून देवाला साकळे घालतात,हा देवी देवतांचा पूजा कार्यक्रम सलग तीन दिवस चालतो व परिसरातील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. आदिवासी देवी देवतांची या पूजा कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी गोटूल भूमी समितीला आर्थिक मदतही दिली.
आदिवासी देवी देवतांची पूजा कार्यक्रमाला येथील देव पुजारी डोलू तलांडी,देव भुम्या जोगा तलांडी,देव वड्डे मारू तलांडी,दलसू तलांडी,रैनू तलांडी,लचू तलांडी,विज्जा तलांडी,माजी जि.प.सदस्य संजय चरडुके,वेलगुर सरपंच किशोर आत्राम,महारु तलांडी,लूला तलांडे,दिलीप आलाम,जुलेख शेख,विनोद कावेरी सह परिसरातील आदिवासी बांधव व नागरिक बहूसंख्येने उपस्थित होते.