संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथे गणित दिवस साजरा
1 min readकुरखेडा, 22 डिसेंबर: आदिवासीं ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथे थोर गणितज्ञ रामानुज यांच्या जयंती निमित्ताने येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताबद्दलची भीती दूर व्हावी याकरिता विद्यार्थ्यांना गणित दिवसाचे महत्त्व पटवून देवून त्यांच्याकडून गणितीय सूत्र व आकडेमोड पद्धती व गणित विषयावर नृत्य बसवून त्यांना गणित दिवसाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथील प्री – प्रायमारी यु. के. जी. च्या विद्यार्थ्यानी गणित विषयाला अनुसरून विविध मॉडेल तयार केले तथा एल. के. जी. च्या विद्यार्थ्यानी गणितिय आकारावर आधारित नृत्य सादर केले आणि वर्ग पहिली ते
चौथी च्या विद्यार्थ्यानी गणित विषयावर विविध मेमोरी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये परिक्षक म्हणून शिक्षिका कोमल निरंकारी आणि प्रियका सहारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पल्लवी पारधी आणि आभार प्रदर्शन प्रीती गिरडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.