मुनघाटे महाविद्यालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन
1 min readकुरखेडा, २० डिसेंबर: स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या ज्ञान स्त्रोत केंद्राच्या वतीने दिवाळी अंक 2024 प्रदर्शनीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अभय साळुंके ,प्रोफेसर नरेंद्र आरेकर ,डॉ.दशरथ आदे, डॉ. गुणवंत वडपल्लीवार, डॉ .दीपक बनसोड,डॉ निकेश लोखंडे, डॉ. अमित रामटेके, डॉ. संदीप निवडंगे, डॉ. हेमंत मेश्राम ,डॉ. रवींद्र विखार , इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी सदर दिवाळी अंक हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे खाद्यान्न असल्याचे मत व्यक्त करीत महाराष्ट्रातील विविध प्रकाशकांनी उपलब्ध केलेल्या दिवाळी अंकाचे प्रदर्शन महाविद्यालयात आयोजित केल्याबद्दल व विविध विषयाचे अंक प्रदर्शनी ठेवल्याबद्दल महाविद्यालया च्या ग्रंथालय विभागाचे प्रमुख डॉ. अनिल भोयर यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी हे अंक वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी असे प्रतिपादन करीत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी सदर अंक हे पर्वणीच असल्याचे मत व्यक्त करीत अशा प्रकारची दिवाळी अंक प्रदर्शनी दरवर्षी महाविद्यालयात आयोजित केल्या जाते.याचा लाभ केवळ महाविद्यालयातील विद्यार्थीच घेत नसून परिसरातील अनेक विद्यार्थी व वाचक घेऊन आपल्या ज्ञानात भर घालतात .महाविद्यालयाचे विद्यार्थी ग्रंथ वाचून उत्तम लेखन करीत असल्याचे प्रतिबिंब महाविद्यालयाच्या दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या मृदुंगध
वार्षिकअंकात दिसत असल्याचे मत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ .अनिल भोयर तर आभार राजेंद्र काचीनवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय विभागाचे सर्व सदस्य , सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.