March 7, 2026

शेतकऱ्यांनो, पिक विमा योजनेत सहभागी व्हा; 31 जुलैपूर्वी अर्ज सादर करा!”

गडचिरोली, 03 जुलै :  शासनाने खरीप हंगाम 2025-26 साठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यास मंजुरी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान, कापूस आणि सोयाबीन या तीन अधिसूचित पिकांसाठी ही योजना लागू असेल. शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळवण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत नजीकच्या बँक शाखा किंवा आपले सरकार सेवा केंद्रात विमा हप्त्यासह अर्ज सादर करावा लागेल.

योजनेची वैशिष्ट्ये:
विमा कंपनी: भारतीय कृषि विमा कंपनी लि. (मेल: pikvima@aicoindia.com).
जोखीम संरक्षण: पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई.
नुकसान भरपाई: पिक कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पन्न यांच्या तुलनेवर आधारित निश्चित केली जाईल.
ई-पीक पाहणी: विमा घेतलेले पीक आणि ई-पीक पाहणीतील नोंदवलेले पीक यात तफावत असल्यास, ई-पीक पाहणीतील नोंद अंतिम मानली जाईल.

शेतकऱ्यांसाठी पर्याय:
बिगर कर्जदार शेतकरी: विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
कर्जदार शेतकरी: योजनेत सहभागी न होण्याचा पर्याय उपलब्ध. यासाठी अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधी घोषणापत्र सादर करणे आवश्यक.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

“शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या बँक शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात विमा हप्ता भरून योजनेत सहभागी व्हावे.”

About The Author

You may have missed

error: Content is protected !!