शेतकऱ्यांनो, खत मिळेना? टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा!
“गडचिरोली कृषी विभागाचा शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्याचा सल्ला”
गडचिरोली, २२ जुलै : खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसे खत मिळावे यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खतांची अनुपलब्धता किंवा पुरवठ्यातील विलंब यासारख्या समस्यांवर उपाय म्हणून, शेतकऱ्यांना कायदेशीर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक +91 82756 90169 उपलब्ध आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी सांगितले की, कृषी विक्रेत्यांकडून खतांचा तुटवडा किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ तक्रार नोंदवावी. यामुळे शेतीचे नुकसान टाळता येईल. प्रशासन अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तक्रार कशी आणि कुठे नोंदवावी?
तालुकानिहाय तक्रार नोंदणीसाठी गुण नियंत्रण कृषी अधिकारी आणि संपर्क क्रमांक:
– गडचिरोली: श्रीमती येरमे अभिलाषा रुषी – 9552199356,
– अहेरी : श्री अनिल चव्हाण – 7038206212
– आरमोरी : श्री रणदिवे युगेश प्रभाकर – 9422908161
– भामरागड : श्री प्राशिक अशोक मेश्राम – 9405713138
– चामोर्शी : श्री गजभिये प्रेमदास पुंडलिक – 9423422151
– देसाईगंज : श्रीमती खोबरागडे शितल रामनाथ – 9766376852
– धानोरा : श्री मडावी पवन सुरेश – 9561723393
– एटापल्ली : श्री राऊत हितेंद्र खुशाल – 9422742417
– कोरची : श्री ईश्वर दयाल पाथोडे – 7768038647
– कुरखेडा : श्री रामटेके संजय दामोधर – 8007453463
– मुलचेरा : श्री लोलमवाड नारायण शेषराव – 8805448424
– सिरोंचा : श्री नेटके अमोल साहेबराव – 9405809032
टोल फ्री क्रमांक – +91 82756 90169

शेतकऱ्यांनी खतांच्या अनुपलब्धतेबाबत तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गडचिरोली (बेरक क्र. 1) येथे संपर्क साधावा.
