आरमोरी विधानसभा क्षेत्रा अंतर्गत रस्त्याच्या बांधकामासाठी २४ कोटी मंजूर; आमदार कृष्णा गजबेंच्या पाठपुराव्यास यश.
1 min read
देसाईगंज;जी एन एन (प्रतिनिधी); ११ फेब्रुवारी:
रस्त्याच्या बांधकामासाठी प्रधानमंञी ग्राम सडक योजने अंतर्गत एकुण ३१.१४ किमी करीता २४ कोटी १ लक्ष २ हजार तीनशे रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याने सदर रस्त्याच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याने आमदार गजबे यांच्या प्रयत्नाचे यश असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.
संपूर्ण देसाईगंज तालुक्यासह आरमोरी विधानसभा क्षेत्रा अंतग॔त येत असलेल्या मुख्य मार्गांची एकुणच झालेली दुर्दशा पाहु जाता या मार्गांवरुन आवागमन करणे कठीण होऊ लागण्यासोबतच पडलेल्या भगदाडांमुळे अपघाताचे वाढते प्रमाण पाहु जाता या रस्त्याच्या बांधकामासाठी यथाशिघ्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी वरिष्ठांकडे सातत्याने लावुन धरली होती.
प्रधानमंञी ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतग॔त आरमोरी विधानसभा क्षेत्रात ही कामे मंजुर करण्यात आली आहेत.यात कुरखेडा तालुक्यातील कसारी-नवेझरी- अंगारा रस्ता,लांबी-८.८८ किमी,किंमत ६ कोटी ६ लाख ७८ हजार ९०० रुपये,राष्ट्रीय महामार्ग ३४३ ते भटेगाव- येडापुर-येंगलखेडा ते सावरगाव,लांबी-३.४१ किमी, किंमत-२ कोटी ५० लक्ष ९९ हजार ८०० रुपये.गुरनोली- गेवर्धा ते गोंदिया जिल्हा सिमा पर्यंत लांबी-४ किमी,किंमत-३ कोटी ३२ लाख ९१ हजार ६०० रुपये.देसाईगंज तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ३५३C ते शिवराजपुर-फरी- किन्हाळा,लांबी-९.०५ किमी, किंमत-७ कोटी ५८ लाख ७ हजार रुपये.आमगाव ते गांधीनगर रस्ता बांधकाम लांबी-५.८०० किमी,किंमत- ४ कोटी ५२ लाख २५ हजार रुपये कामांचा समावेश असुन एकुण ३१.१४ किमीवर रस्ता बांधकामासाठी २४ कोटी १ लाख २ हजार तीनशे रुपये मंजुर करून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सदर मार्ग बारमाही रस्ताने जोडले गेले असल्याने व या मार्गांवरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक केली जात असल्याने पडलेल्या भगदाडांमुळे वाहतूकीसह आवागमनाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. खड्ड्यांमुळे अनेकदा वाहणाला अपघात घडून काहींना कायमचे अपंगत्व तर काहींना जबर दुखापत झाल्याने या रस्त्याच्या बांधकामासाठी सातत्याने ओरड होऊ लागली होती. वाहतूकदारांसह स्थानिक नागरीकांची ही गंभीर समस्या लक्षात घेता आमदार गजबे यांनी वरिष्ठांकडे आग्रही भुमिका घेत संबंधित रस्त्याच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरुच ठेवला होता.त्या अनुषंगाने उपरोक्त रस्त्याच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने रस्ता बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने आमदार गजबे यांच्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे सांगितले जात आहे.