“किदवाई शाळेच्या मुलांनी घेतली पोलीस दलातील शस्त्रास्त्रांची माहिती”
1 min readदेसाईगंज;(प्रतिनिधी); ६ मार्च: विसोरा राज्य राखीव पोलिस दल गट-१३ च्या समादेशक डाॅ.प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देसाईगंज येथील रफी अहमद किदवाई प्राइमरी सेमी इंग्लिश शाळेच्या मुलांना नक्षल संरक्षण विभागाचे कमलेश नानीर यांनी पिस्तूल,एसएलार,एके- ४७,इंसास,एलएमजी यासारख्या अनेक अत्याधुनिक हत्यारांची माहिती दिली.
यावेळी राज्य राखीव पोलिस दल गट-१३ चे सहाय्यक समादेशक दशरथ जांभुळकर,पोलिस निरीक्षक प्रकाश देवराव एकोनकर, मुख्यालयाचे पोलिस निरीक्षक संजय गाडेकर,पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर धनविश,मोहसीन खान, मुख्याध्यापक मो. आरिफ शेख,शिक्षक फरहत शेख , अल्मास खान,सालेहीन शेख, लक्ष्मी कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान रफी अहमद किदवाई प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेच्या वतीने पोलीस जवानांची हुतात्मा या विषयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.राज्य राखीव दलाच्या वतीने शाळेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या विस्तृत माहिती बद्दल शाळेचे शिक्षक सलमान अहमद शेख यांनी आभार व्यक्त केले.