“हर्षदा आत्महत्या प्रकरणी सासरच्या चार जणांना अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी”
1 min readकुरखेडा;(प्रतिनिधी); १३ मार्च: तालुक्यातील खरकाडा येथील पंचवीस वर्षीय नवविवाहितेने हुंड्यासाठी सासरी होणा-या छळाला कंटाळून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नवविवाहितेच्या वडिलांच्या हुंड्याकरिता छळ करुन आत्महत्सेय प्रेरित केल्याच्या तक्रारीअंती पतीसह सासरच्या चार जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हर्षदा महेश बाबुराव बन्सोड (25) रा. खरकाडा असे आत्महत्या करणा-या नवविवाहितेचे नाव असून महेश बाबुराव बन्सोड (30) पती, बाबुराव रुषी बन्सोड (55) सासरे, उषा बाबुराव बन्सोड (50) सासु व दीर प्रणय बाबुराव बन्सोड (26) सर्व रा. खरकाडा असे अटक करण्यात आलेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार देसाईगंज तालुक्यातील बोळउा येथील हर्षदा प्रल्हाद गायकवाड हिचा 19 एप्रिल 2022 रोजी खरकाडा येथील महेश बाबुराव बन्सोड यांचा विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच हर्षदाला शारीरिक, मानसीक त्रास देणे सुरु झाले. तसेच शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करायची असून याकरिता 5 लाख रुपये तुझ्या वडिलांकडून घेऊन असा तकादा घरातील मंडळी लावून होते. घटनेच्या चार दिवसांपूर्वी पुन्हा एकदा यासंदर्भातच कुटूंबियांची हर्षदाचे भांडण झाले होते. याबाबत हर्षदा वडिलांना फोन करुन माहिती देत मला घेऊन जाण्याची विनंतीही केली होती. मात्र त्यापूर्वीच हर्षदाने घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
वडिलांनी यासंदर्भात वडिला कुरखेडा पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी छळ करीत मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीअंती कुरखेडा पोलिसांनी आज मंगळवारी, हर्षदाचे पती, सासु, सासरे तसेच दिरावर कलम 304 बी, 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करीत सासरच्या मंडळींना अटक केली. दरम्यान आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास कुरखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाठील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश गावंडे करीत आहेत.