December 23, 2024

“सूसाट दूचाकीची विद्यार्थीनीला धडक,दूचाकीचालक ठार तर विद्यार्थीनी गंभीर जखमी”

1 min read

कूरखेडा;(प्रतिनिधी); २७ मार्च: महाविद्यालयातून परत येत असताना विद्यार्थीनीला सूसाट दूचाकीने मागून येत जोरदार ‌धडक दिल्याने दूचाकी चालक ठार तर विद्यार्थीनी गंभीर जखमी झाल्याची घटणा आज सकाळी ११.३० वाजेचा सूमारास कूरखेडा-देसाईगंज मार्गावरील विद्यानगर वळणावर‌ घडली.
येथील मुनघाटे महाविद्यालयात बि. ए. प्रथम वर्षाला शिकणारी विद्यार्थीनी आचल जिवन कोडाप (२०) रा. मौशी ही सकाळ पाळीत असलेला वर्ग आटोपत महाविद्यालयातून शहराकडे वर्ग मैत्रिणीसह पायीच परत येत होती, दरम्यान याच वेळी सूसाट वेगात येत इलेक्ट्रिक कारागीर असलेला दूचाकी चालक विनोद रमेश तोंडफोडे (३६) रा नान्ही याने विद्यार्थीनीला मागून जोरदार धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर कोसळले, त्यांचा डोक्याला हातापायाला गंभीर दूखापत झाली, लगेच त्याना १०८ क्रमांकाचा रूग्नवाहीकेने उपजिल्हा रूग्नालयात आणण्यात आले. येथे प्राथमिक उपचारानंतर विनोद तोंडफोडे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्नालय गडचिरोली येथे हलविण्यात आले मात्र उपचारा दरम्यान सांयकाळी ४ वाजता त्याची प्राणजोत मावळली.
मागील काही दिवसा पासून तालूक्यासह शहरात सूसाट दूचाक्या पायी चालणाऱ्या करीता सूद्धा कर्दनकाळ ठरत आहेत. वेगाची स्पर्धा जिवघेणी ठरू पाहत आहे. काल रविवार रोजी सूद्धा कढोली येथे दूचाकीची समोरा समोर कारला धडक बसल्याने एका वृध्द महिलेला आपला जीव गमवावा लागला. शहरात सूद्धा विषेशता शाळा महाविद्यालय भरण्याचा व सूटण्याचा वेळेत येथील काही मजनू टाईप यूवक मंडळी महाविद्यालयीन तरूणीना प्रभावित करण्याकरीता धोकादायक पद्धतीने सूसाट वेगात वाहन चालवत स्वतासह दूसर्याचा जीवावर उदार होतात. या मार्गावर सातत्याने लहान मोठ्या अपघाताचा घटणा घडत आहेत. यांचावर प्रतिबंध लावण्याकरीता महाविद्यालयीन वेळेत पोलीस विभागाने वाहतूक शिपाई व सी. सी. टी. व्ही कॅमेरे मार्फत मनचले यूवक मंडळी‌,सूसाट बायकर्स वर नियंत्रण आणत कार्यवाही करावी अशी मागणी शहर वासीयाकडून करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!