December 23, 2024

“कुरखेडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी पोलिसात लेखी तक्रार दाखल”

1 min read

कुरखेडा; (प्रतिनिधी); १३ जून: अवैध विटा भट्टी व रेती उपसा संदर्भात बातम्या प्रकाशित केल्या म्हणून पत्रकाराच्या घरासमोर व परीवरातील सदस्यांना पाहून त्यांच्या समोर अर्वाच्य व अश्लील भाषेत सर्व पत्रकारांना शिवीगाळ केल्या प्रकरणी तालुका पत्रकार संघ कुरखेडा यांनी पोलिस स्टेशन कुरखेडा येथे तक्रार दाखल करून पत्रकारांना अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांना शिवीगाळ करीत असलेली व्हिडिओ क्लिप यावेळी सादर केलेली आहे.
कुंभिटोला येथील देवानंद रेवनाथ नाकाडे हा इसम मागील अनेक वर्षंपासून अवैध विटा भट्टी व रेती उपसाचे कामात सक्रिय आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा साथ लाभल्यामुळे यावर अजून एक ही कार्यवाही झाली नाही. मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून वाम मार्गाने आर्थिक पाठबळ वाढल्याने त्याची अधिकच हिम्मत वाढली असल्याने “हमारा कोण क्या बिघाड लेंगा”, या ऐटीत मिरवत आहे.
तालुक्या मुख्यालय लगत मौजा कुंभिटोला गावा लगत असलेल्या सती नदी मधून मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या बातम्या स्थानिक वार्ताहर यांनी प्रसिद्ध केल्या होत्या. या नंतर कुरखेडा तहसीलदार यांनी कार्यवाही करत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या मुसक्या आवरत कार्यवाही केली. एकाच रात्री तीन ट्रॅक्टर वर कार्यवाही झाल्याने कुंभीटोला येथील देवानंद रेवनाथ नाकाडे हा इसम स्थानिक वार्ताहर यांच्या घरासमोर व परिवारातील लोकांना पाहून संपूर्ण पत्रकारांना आर्वाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होता. त्याचे शिवीगाळ असहनिय झाल्याने येथील पत्रकार यांचे धाकटे बंधू यांनी त्यांच्या भ्रमण ध्वनिवर देवनाथ रेवनाथ नाकाडे याचे संपूर्ण संभाषण, शिवीगाळ रेकॉर्ड केली. त्या रेकॉर्डिंग मध्ये देवनाथ रेवनाथ नाकाडे हा इसम पत्रकारांना उद्देशून सार्वजनिक ठिकाणी पत्रकारांच्या घरा समोर अश्लील भाषेत शिवीगाळ करीत असल्याने या अवैध रेती व विटा भट्टी धारक यांचे वर योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करावी अशी तक्रार पोलिस स्टेशन कुरखेडा येथे दाखल केली आहे.
सादर इसमावर चौकशी करून योग्य गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याचे आश्वासन येथील ठाणेदार संदीप पाटील यांनी पत्रकारांच्या शिष्ट मंडळला दिले आहे.
यावेळी पोलिस स्टेशन येथे कुरखेडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज पठाण, सचिव नसीर हाशमी, उपाध्यक्ष विजय भैसारे, सहसचिव विनोद नागपूरकर, सदस्य शिवा भोयर, ताहीर शेख, कृष्णा चौधरी, महेंद्र लाडे, सूरज गावतुरे, चेतन गाहाने प्रामुख्याने उपस्थित होते.
“सदर ईसमावर विटा भट्टी विरोधातील आंदोलक व स्थानिक पत्रकारा चेतन गहाने याला शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कुरखेडा पोलिस स्टेशन येथे पूर्वीचा गुन्हा दाखल आहे.”

About The Author

error: Content is protected !!