“मका पीक खरेदीत अन्याय होत असल्याचा शेतकऱ्याचा आरोप”; जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); १४ जून: आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडा यांच्याकडून सुरू असलेल्या मका पीक खरेदीत खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप येथील शेतकरी रमेश देवनाथ गोन्नडे यांनी केलेला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करत श्री गोन्नाडे यांनी तक्रार केली आहे की, कुरखेडा येथील मका खरेदी केंद्रावर अन्याय पूर्वक बारदाण्याचा दीड किलो वजन घेतल्या जात आहे. नंबर नसतानाही मनमानी पद्धतीने मका खरेदी करिता अग्रक्रम स्वीकारला जातो. शेतकऱ्यांच्या नावे ऑनलाईन केलेला व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जात आहे. या सर्व भोंगळ कारभारामुळे येथील खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या निवेदनातून केला आहे. येथील खऱ्या शेतकऱ्यांच्या माल मोजणी करिता टाळाटाळ केली जाते व व्यापाऱ्यांचा नंबर नसतानाही त्यांचा माल मोजून गोदामात ठेवला जातो त्यामुळे इतर शेतकऱ्यांना स्वतःचे माल या खरेदीकरदीत केंद्रावर विक्री करण्यास मोठी अडचण होत आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांचे मका पीक उघड्यावर सदर केंद्रावर पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. कुरखेडा येथे सुरू असलेल्या मका खरेदी केंद्रावर 30 किलोमीटरच्या वर आंतर असलेले शेतकरी विक्रीकरिता येत असल्यामुळे येथील गोदामाची अपुरी व्यवस्था असल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांचा माल मोजला नाही. शेतकऱ्यावर होत असलेल्या सदर अन्याय दूर करण्याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी विनंती त्यांनी निवेदनात केली आहे. या सर्व भेगळ कारभारामुळे त्रस्त होऊन एखादा शेतकऱ्याने आत्महत्या केल्या शिवाय राहणार नाही, तर त्याच्या आत्महत्येस सर्वस्वी जबाबदारी प्रशासनच राहील असे त्यांनी म्हटले आहे.