आलापल्लीत आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन च्या वतीने करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षांवर चर्चासत्र तथा यशस्वीतांचा सत्कार व बक्षीस वितरण”
1 min read“माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते यशस्वीतांचा सत्कार व बक्षीस वितरण”
अहेरी, (अन्वर शेख); प्रतिनिधी, २३जून : अहेरी तालुक्यातील आलापल्ली स्थित ग्लोबल मीडिया इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व शारीरिक गुणवत्ता विकास साधण्यासाठी दि. १८ जून रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा व मार्गदर्शकाद्वारे करिअर गायडन्स तथा विविध शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात प्रावीण मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार माजी आमदार दीपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.
करिअर मार्गदर्शन तथा बक्षीस वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष ईश्वरजी वेलादी तथा प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे उपस्थित होते. सकाळी ६ वाजता आलापल्ली येथील भामरागड रोडवर मुले व मुलींसाठी तीन गटात मॅरेथॉन स्पर्धा घेऊन ११ ते १२ वाजेपर्यंत सामान्य ज्ञान स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. यशस्वीतांना रोख रक्कम माजी आमदार दीपक आत्राम यांनी मातापित्यांच्या स्मृती पित्यर्थ दोन गटाला व एका गटाला स्व. गोविंदाची आलाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी जिप सदस्या अनिताताई आत्राम यांच्याकडून रोख रक्कम व शील्ड देणगीदारांकडून देण्यात आली. दुपारी १२.३० ते ३.३० वाजेपर्यंत राय सर, विनोद दहागावकर, सतीश पनघंटीवार, प्रीतम गग्गुरी यांनी पुढील वाटचालीसाठी दहावी व बारावीनंतर काय?, भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञानावर प्रशिक्षण व रोजगाराच्या संधीवर शैक्षणिक मार्गदर्शन केले. यावेळी डॉ सलुजा दाम्पत्य, तालुका पत्रकार संघटनेचे सल्लागार सदाशिव माकडे, माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते.
सायंकाळी ४ वाजता आदिवासी लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित एकदिवशीय कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धा परीक्षा व मॅरेथॉन मध्ये प्रथम आलेल्या सोबतच दहावी व बारावी मध्ये गुनाणूक्रमे प्रथम येणारे तसेच महाराष्ट्र स्पोर्ट असोसिएशनचे सचिव तथा प्रशिक्षक कुमार सानू यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव मिळविणाऱ्या विविध खेळाडूंचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतीक गेडाम, रुपेश आत्राम, तिरुपती वेलादी,सूरज मडावी,दीपक मेश्राम,सूरज मेश्राम सुनील आत्राम सह आदिवासी लोकसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.