“गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हटवीणार नाही, पण लवकरच मोह फुलावर आधारित प्रक्रिया उद्योग गडचिरोलीत सुरू होणार” – अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम
1 min readगडचिरोली;(प्रतिनिधी): गडचिरोली जिल्ह्याची दारू बंदी आम्हीच केली. आम्ही ते हटविणार नाही. जिल्ह्यातील फसलेली दारू बंदीवर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांनी सदर प्रक्रिया दिली.
दारू बंदी ची जिल्ह्यात समीक्षा व्हावी व दारू बंदीची जिल्ह्याला गरज नाही अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातून एकायला मिळते. जिल्ह्यातील दारू बंदी हटवावी अशी मागणी वारंवार होत असते. याबाबत शासनाची बाजू आज मंत्री आत्राम यांनी स्पष्ट केली. दारूबंदी विषयात शासनाचे धोरण निश्चित असून कुठलेही दारूबंदी उठविण्याचे प्रश्नच नसल्याचे यावेळी बोलून दाखविले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन उपज मोह फुलचे उत्पादन होत असून येत्या महिन्याभरात गडचिरोली येथे मोह फुलावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करणार असल्याची माहिती आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली..
मंत्री आत्राम हे सध्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर असून ते येथील सर्व तालुक्यांमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करून विविध विभागाच्या कामांचा आढावा घेत आहेत. राज्यामध्ये राजकीय अस्थिरतेचे चित्र असताना मंत्री राजे धर्मराव आत्राम यांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व आलेले आहे. येत्या 25 तारखेला महाराष्ट्र राज्यातील आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता असताना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील तालुके पिंजून काढत प्रशासकीय आढावा सोबतच पक्ष बांधणीचे काम यावेळी होत असल्याचे चित्र आहे.