December 22, 2024

“शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकरीता एकविध क्रीडा संघटनांनी नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे; जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रशांत दोंदल”

1 min read

गडचिरोली,(प्रतिनिधी); २२ सप्टेंबर: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सन 2023-24 या सत्रात विविध स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याकरीता दि. 10/08/2023 रोजी जिल्ह्यातील सर्व एकविध संघटनांची सभा आयोजीत करण्यात आलेली होती. सदर सभेत आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी,माँटेक्सबॉल क्रिकेट, मिनी गोल्फ, सुपरसेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सींग, हाफकिडो बॉक्सींग,रोप स्किपींग,सिलबम, वूडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग त मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल,टेनिस क्रिकेट, जित कुन दो, फुटसाल, कॉर्फबॅल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग,पेंन्टाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स,चॉकबॉल, चॉयक्वांदो, फुटबॉल टेनिस, म्युजिकल चेअर, टेनिस बॉल क्रिकेट या खेळांचे जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित नसल्याने उपरोक्त स्पर्धा आयोजनाबाबत नियोजन करता आले नाही. करीता या सत्रातील उपरोक्त विविध स्तरावरील स्पर्धा आयोजनाच्या नियोजनाकरीता जिल्ह्यातील वरील क्रीडा प्रकराच्या एकविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे त्वरीत संपर्क साधुन राज्य संघटनेशी संलग्न असल्याचे संलग्नता प्रमाणपत्र सादर करावे व विविध स्तरावरील स्पर्धेचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत त्वरीत संपर्क साधावा जेणेकरुन उपरोक्त स्पर्धांचे आयोजन संघटनेच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्याने करणे सोईचे होईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.

About The Author

error: Content is protected !!