गोंडवाना विद्यापीठातील खेळाडूंची आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत उत्कृस्ट कामगिरी
1 min readगडचिरोली, 27 जून : राजस्थानातील जे.जे.टी. विद्यापीठ, झुझुंनू येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धा 7 ते 10 जुन 2024 या कालावधीत पार पडली. या आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत पुरुष व महिला अशा दोन्ही गटात पदके पटकाविली.
या स्पर्धेमध्ये स्ट्रोक इव्हेंटमध्ये पुरुष व महिला गटाने ब्राॅंझ पदक प्राप्त करत तिसरे स्थान पटकाविले. तसेच सिंगल स्ट्रोक इव्हेंटमध्ये पुरुष गटाने ब्राॅंझ पदक प्राप्त करत चौथे तर डबल स्ट्रोक इव्हेंटमध्ये तिसरे स्थान पटकाविले. त्यासोबतच, टिम इव्हेंटमध्ये महिला गटाने ब्राॅंझ पदक प्राप्त करत तिसरे स्थान पटकाविले. तर डबल स्ट्रोक इव्हेंटमध्ये सिल्वर पदक प्राप्त करत दुसरे स्थान पटकाविले.
खेळाडूंच्या उत्तम प्रदर्शनाचे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, क्रीडा व शारिरीक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे यांनी अभिनंदन केले.