गोंड- गोवारी अभ्यास समिती १५ व १६ जुलै रोजी नागपूरात* ; “सामाजिक संघटनांकडून स्विकारणार निवेदने”
1 min readगडचिरोली,दि.08(जिमाका): उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधिश के.एल.वडणे यांच्या अध्यक्षतेखाली गोंड-गोवारी समाजाच्या निवेदनावर अभ्यास समिती स्थापन असुन सदरच्या अभ्यास दौरा करीता श्री. वडणे हे दिनांक 15 व 16 जुलै 2024 रोजी रविभवन, शासकीय विश्रामगृह, नागपुर येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते नागपूर विभागातील गोंड गोवारी समाजाच्या संघटनाचे निवेदन स्विकारणार आहेत.
सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसुचीत जमाती प्रमाणपत्र समिती गडचिरोली कडुन गोंड-गोवारी समाजाच्या संघटना तसेच त्यांचे प्रतिनिधी यांना आवाहन करण्यात येते की, लेखी निवेदने सादर करावयाची असल्यास दि.15 व 16 जुलै 2024 रोजी रविभवन, शासकीय विश्रामगृह, नागपूर येथे सादर करावे. असे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, सहआयुक्त जितेंद्र चौधरी यांनी कळविले आहे.