स्वाधारगृहात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
1 min readचामोर्शी ९ जुलै : तालुक्यातील घोट येथील मातोश्री स्वाधारगृह येथे आश्रयाला असलेल्या एका महिलेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना ७ जुलै रोजी सायंकाळी ६:४५ वाजता घडली. सलोनी दीपक निशाणे (३० रा. मुरखळा ता. चामोर्शी) असे मयत महिलेचे नाव आहे. पती-पत्नीत पटत नव्हते, त्यामुळे ती २९ मे २०२४ पासून घोट येथे लोकमंगल संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या मातोश्री स्वाधारगृहात ठेवले होते.
७ रोजी सायंकाळी प्रार्थनेची वेळ झाल्याने तिला खोलीबाहेर बोलावले, पण तब्येत बरी नाही, असे सांगून ती गेली नाही. खोलीत पंख्याला ओढणीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. जेवण करण्याकरिता महिला बोलावण्यास गेल्या तेव्हा त्या गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्या. सिस्टर मर्लिन यांच्या खबरीवरून घोट पोलिस मदत केंद्रात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. उपनिरीक्षक लालबहादूर मशाखेत्री तपास करीत आहेत.