“केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून द्या – आ. डॉ. देवराव होळी यांचे आवाहन”
1 min read“चामोर्शी येथे तालुका व शहर भाजपा पदाधिकारी कार्यकारिणीची बैठक”
गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १६: ( चामोर्शी) : नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेसह, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची थकीत वीज माफी, शेतकऱ्यांना कृषी वीज मोफत, मुलींना मोफत शिक्षण, ३ सिलेंडर मोफत, ओबीसी सह आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींना वैद्यकीय शिक्षणासह व्यवसाय शिक्षणात १०० टक्के शुल्क माफ यासारख्या जनकल्याणाच्या योजना घोषित केल्या या योजनांचा अधिकाधिक लाभ गरीब व सर्वसामान्य महीला, शेतकरी व संबधित लोकांना मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी येथील भाजपा तालुका व शहर कार्यकारणीच्या बैठकी प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी खा. अशोक नेते, माजी आ. नामदेवराव उसेंडी, भाजपा नेते बाबुराव कोहळे, लोकसभा समन्यवक प्रमोद पिपरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, सुरेश शहा, डॉ. मिलिंद नरोटे, मधुकर भांडेकर, शहर अध्यक्ष सोपान नैताम, तालुका महामंत्री विनोद गौरकार, काशिनाथ बुरांडे, संजय खेडेकर, नगरसेविका रोशनी वरघंटे, कविता किरमे, यांचेसह भाजपा पदाधिकारी बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.