April 27, 2025

“१८ ऑगस्ट रोजी आलापल्लीत भव्य रोजगार मेळावा, युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे – मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन”

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १६ :  (अहेरी) ; जिल्ह्यात मोठमोठ्या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न सुरू असून येत्या १८ ऑगस्ट रोजी आलापल्ली येथील क्रीडा संकुल आवारात भव्य रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. त्या मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे.

जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात कोनसरी येथील लोह प्रकल्पासोबतच अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात कंपनीच्या स्टील प्रकल्प होऊ घातला आहे.यासह आणखी काही प्रकल्प होणार आहेत.त्यासाठी विविध कंपन्या कोट्यवधी रुपयांचा गुंतवणूक करणार आहेत.या प्रकल्पामध्ये स्थानिक बेरोजगारांना संधी देण्यात येणार असून येत्या १८ ऑगस्ट रोजी आला पल्ली येथील क्रीडा संकुल आवारात भव्य रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.

लोकांनी मोठ्या अपेक्षेने आपल्याला निवडून दिले असून सिंचन, शिक्षण आणि रोजगार यावर आपला भर आहे.येथील शेती सुजलाम सुफलाम व्हावी म्हणून विविध ठिकाणी उपसा सिंचन करून पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.शिक्षणासाठी तर काम सुरूच आहे.बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं या उदात्त हेतूने मोठमोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. १७ जुलै रोजी सुरजागड इस्पात कंपनीच्या स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन होणार त्यांनतर अडीच हजार कोटींचा आणखी एक प्रकल्प होणार आहे.
सुशिक्षित युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!