December 23, 2024

“भारधाव कारने तिघांना उडविले; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांचा जखमींत समावेश”

1 min read

गडचिरोली  न्यूज नेटवर्क, ऑगस्ट ०९ (गडचिरोली) : चामोर्शी रोडवर मॉर्निंग वॉक करिता निघालेल्या तिघांना चामोर्शी कडून येणाऱ्या कारने समोरून धडक देऊन कारचालक पसार झाला. ही घटना ८ ऑगस्टला सकाळी साडेपाच वाजता घडली.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांचा जखमींत समावेश आहे. बाळू टेंभुर्णे हे गोगावचे सरपंच राजू उंदिरवाडे, वसंत मेश्राम (तिघे रा. गोकुलनगर, गडचिरोली) यांच्यासमवेत ८ ऑगस्टला पहाटे सेमाना मंदिराकडे फिरण्यासाठी गेले होते. मंदिरापासून परतताना समोरून आलेल्या कारने त्यांना धडक दिली. चालकाचा ताबा सुटल्याने विरुद्ध दिशेने येऊन कारने या तिघांना उडवले धडक एवढी जोराची होती की, अपघातानंतर कारची नंबरप्लेट तेथे तुटून पडली. चालक कारसह पसार झाला. घटनास्थळी (एमएच ३३ व्ही- ००९०) या क्रमांकाची नंबरप्लेट आढळली. मेश्राम यांना अधिक उपचारासाठी चंद्रपूरला हलविले असून टेंभुर्णे व उंदीरवाडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

About The Author

error: Content is protected !!